दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील 

376 0

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात चौकशीसाठी हजर झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आम्हाला त्रास दिला म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देणार, असा प्रकार मविआ सरकारकडून सध्या सुरू आहे. त्यामुळे एका व्हिडिओ बॉम्बमुळे इतकी चिडीचूप झाली आहे. त्यामुळे दुसरा व्हिडिओ बॉम्ब तर याहून स्ट्रॉंग असून दोन दिवसांतच नवा व्हिडिओ बॉम्ब फोडणार असल्याचं पाटील यांनी सांगितले 

घाबरवण्याचा प्रयत्न सुरू असला त्रू घाबरणारे लोक आम्ही नक्कीच नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. फडणवीसांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. मुख्यमंत्रीपदी असताना चांगल काम केल्यानेच सगळी जनता देवेंद्रजींच्या सोबत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीपुण्यात पत्रकाराशी बोलताना दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले,फोन टॅपिंग प्रकरणात कोणाचा समावेश आहे.याची खोलात जाऊन चौकशी करण्याएवजी देवेंद्रजी जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांची चौकशी होत आहे. ज्यांना माहितीचा स्त्रोत कायद्याप्रमाणे विचारता येत नाही.

त्यांना चौकशीला बोलावले आहे की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली. लोकशाहीत सत्ताधारी पक्षावर अंकुश मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेत्याच्या पदाची निर्मिती झाली.

लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांच्या समांतर महत्व मिळाले. त्याला माहिती कुठून मिळते हे जर तो सांगायला लागला, तर तो सत्ताधाऱ्यांची प्रकऱणे उपस्थित करू शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याला माहिती कुठून मिळते हे विचारायचे नसते. पण मविआ सरकारमध्ये अंधेरी नगरी चौपट राजा कारभार चाललेला आहे. त्यामुळे मविआचा पाय खोलात आहे. असे पाटील म्हणाले.

Share This News

Related Post

लक्ष्मीकांत देशमुख यांचा भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Posted by - December 14, 2022 0
पुणे: फॅक्चर्ड फ्रिडम मराठी अनुवादित या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार…

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीचे योग्य नियोजन करा ! चंद्रकांत पाटील यांच्या वाहतूक पोलिसांना सूचना

Posted by - August 27, 2022 0
पुणे : आगामी काळ हा उत्सवांचा आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीचे योग्य…

PHOTO : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर ३१ हजार महिलांची उपस्थिती

Posted by - September 1, 2022 0
पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर…
Naresh Mhaske

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार…कोण आहेत नरेश म्हस्के?

Posted by - May 1, 2024 0
ठाणे : ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत…

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा

Posted by - June 17, 2023 0
मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून यामुळं शिवसेना वर्धापन दिनाअगोदरच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  शिशिर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *