Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा पंधरवडा – धीरज घाटे

450 0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा आयोजित केला असून या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

घाटे यांनी सांगितले, की सेवा पंधरवड्यात युवा मोर्चातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रम ही होणार आहेत. आयुष्यमान भव सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्ड वाटप तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी, धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनीही आयोजित केली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले 9 वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष संघटनेकडून त्यांचा सेवाभाव विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही घाटे म्हणाले.

Share This News

Related Post

देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार – प्रकाश जावडेकर

Posted by - January 30, 2022 0
देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार असल्याची…

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने 11 लाखाचे सोने केले जप्त; महिलेने सोन्याची अफरातफर करण्यासाठी लढवली अशी शक्कल

Posted by - December 22, 2022 0
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिस्टम विभागाने ११ लाखाचे सोने केले जप्त केले आहे. सुमारे ११ लाखाच्या सोन्याची अफरातफर करणाऱ्या…

TRAFFIC INFORMATTION : बावधन वाहतुक विभागाअंतर्गत वाहतुकीत बदल

Posted by - October 4, 2022 0
पुणे : बावधन वाहतुक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) जुना पुल पाडल्यानंतर तेथील रस्त्याच्या बाजुचे खडक फोडण्याचे…

खळबळजनक : पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण विशेष शाखेच्या जाळ्यात; बनावट भारतीय पारपत्र जप्त

Posted by - March 15, 2023 0
पुणे : पुण्यातून आज बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेनं पकडल आहे. महंमद अमान अन्सारी (वय वर्ष 22) असे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *