Murlidhar mohol

Murlidhar Mohol : उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ

370 0

पुणे : शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले मंडई, गाडीखाना, खडकमाळ आळी, कस्तुरे चौक, कृष्णाहट्टी चौक, लोहियानगर, मीठगंज पोलीस चौकी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, दीपक मिसाळ, स्वरदा बापट, अजय खेडेकर, विष्णू हरिहर, आरती कोंढरे, सम्राट थोरात, योगेश समेळ, राजेश येनपुरे, संजय देशमुख, राजेंद्र कोंढरे, राजेंद्र काकडे, अमित कंक, चंद्रकांत पोटे, गौरव साइनकर, प्रशांत सुर्वे, निलेश कदम,, गणेश भोकरे, अजय दराडे, कपिल जगताप, प्रमोद कोंढरे, प्रणव गंजीवाले, उमेश चव्हाण, अभिजीत राजपूत, दिलीप काळोखे, उदय लेले, अश्विनी पवार, निर्मल हरीहर, संकेत थोपटे, वैशाली नाईक, निलेश जगताप, नामदेव माळवदे, ईश्ताइक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, “एमएसएमई आणि स्टार्टअप क्षेत्राची क्षमता वाढवून शहराला देशात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. स्वतंत्र विमानतळ, पायाभूत सुविधांची निर्मिती, किफायतशीर औद्योगिक वीजदर, मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ, मोक्याची जागा, सुरळीत वाहतूक आदी उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करू. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी नियमित संवाद साधणार आहे.”

मोहोळ पुढे म्हणाले, “आयटी हबला बूस्टर मिळावा यासाठी धोरण आखणार आहे. आयटी हबमुळे बांधकाम क्षेत्रापासून लॉन्ड्री, मेसपर्यंत छोट्या-मोठ्या व्यवसायांतून रोजगार निर्मिती होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. राज्याच्या दरडोई उत्पन्नात 18 टक्के वाटा पुणे शहराचा आहे. उद्योग, सेवा आणि व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच निर्यात वाढीसाठी जिल्ह्याचा आराखडा तयार करणार आहे.”

विकसित पुण्यासाठी संशोधनाला देणार चालना
एनसीएल, एनआयव्ही, एसीसीएस, एनसीआरए, आयुका, आयसर, सी-डॅक, सी-मेट, आयआयटीएम, सीडब्ल्यूपीआर अशा दोन डझनपेक्षा जास्त संशोधन संस्था शहरात आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासात या संशोधन संस्था निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. विकसित पुण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून संशोधनाला चालना देणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर

Ajit Pawar : ‘निवडणूक होऊ द्या! एका एकाला कसा सरळ करतो’ अजित पवारांनी भरसभेत दिला दम

Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…

Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान खात्याने दिला ‘हा’ नवीन अलर्ट

Gold Rate : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महागलं!

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Ravindra Dhangekar : मित्र पक्षांच्या सक्रिय योगदानामुळे पुण्यातील काँग्रेसची दावेदारी अधिक मजबूत रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केला विश्वास

Posted by - May 7, 2024 0
पुणे : इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय व उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसची…
Nagar News

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त

Posted by - June 2, 2024 0
पारनेर : अहमदनगरमधील सुपा येथे थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली. राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त…

कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Posted by - July 6, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या भेटीमुळे…

पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने ८८ आस्थापनांवर कारवाई

Posted by - November 10, 2022 0
पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *