Pune News

Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ

323 0

पुणे : विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता करण्यासाठी नवमतदारांनी महायुती ला मतदान करावे असे आवाहन महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधरअण्णा मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केले.परशुराम सेवा संघाच्या वतीने आयोजित युवा ब्राह्मण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे,परशुराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वजित देशपांडे, उपाध्यक्ष अपर्णाताई वैद्य, महायुती चे समन्वयक आणि भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले,शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे इ मान्यवर उपस्थित होते.

तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि त्याचे तुम्हाला औत्सुक्य आहेच पण त्याच बरोबर भारताच्या विकासाचे भागीदार आणि साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.ह्या निवडणुकीत मोदीजीच विजयी होणार याची इतर देशांना देखील खात्री आहे कारण आत्ताच अनेक राष्ट्रप्रमुखांनी निवडणुकीनंतर त्यांच्या देशाला मोदींनी भेट द्यावी यासाठी आत्ताच निमंत्रण पाठविले आहे असेही ते म्हणाले. तसेच पुणे शहराच्या विकासात माझे योगदान असेल आणि तुमच्या स्वप्नातील पुणे उभारण्यासाठी मी सर्वतोपरी कार्य करेन असे ही मोहोळ म्हणाले.आज येथे एकत्र आलेले शंभर पेक्षा जास्त ब्राह्मण युवा वर्ग जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचेल आणि पुण्यात भाजपा ला मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती करेल असे परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी स्पष्ट केले.

भारत तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करत असून यासाठी नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प नवमतदारांनी करावा, कारण देशाच्या विकासात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे महायुती चे समन्वयक संदीप खर्डेकर म्हणाले. युवकांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्माणाचे कार्य सुरु असून पंतप्रधान मोदी यांनी स्टार्ट अप च्या माध्यमातून तुमच्या कल्पनाशक्तीतून जे अभिनव प्रॉडक्ट बनविण्यात येत आहेत त्याला देशांतर्गतच प्रचंड वाव आणि बाजारपेठ उपलब्ध केली आहे असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.

शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देताना “तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस वीस तास काम करत आहेत, त्यांचे हात बळकट करून राष्ट्रनिर्मिती च्या कार्यात सहभाग नोंदविण्यासाठी पहिले मतदान मोदींना करा असे आवाहन देखील धीरज घाटे यांनी केले.माधव भांडारी यांनी देखील युवा वर्गाशी संवाद साधला. कार्यक्रमाचे संयोजन आणि प्रास्ताविक विश्वजित देशपांडे यांनी केले तर अपर्णा वैद्य यांनी आभार मानले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

karekar

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Posted by - May 11, 2024 0
नागपूर : शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपुरात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला…
Sanjay Raut

Lok Sabha : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय…; संजय राऊतांची बोचरी टीका

Posted by - April 28, 2024 0
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एकेकाळचे (Lok Sabha) आपले राजकीय सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…

पुण्यातील ससून रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Posted by - April 6, 2023 0
पुण्यातील ससून रुग्णालयावर लाचलुचपत विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात तपास अधिकारी पोहचले असून दुपारपासून…

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण?

Posted by - May 23, 2022 0
गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे  पुन्हा एकदा नव्या वादाने चर्चेत आले आहेत. गुट्टे यांच्यावर आता गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. कारण…
Sharad Pawar

Sharad Pawar : ‘2004 ला भाजपसोबत जायचं होतं?’ शरद पवारांचा मोठा खुलासा

Posted by - December 2, 2023 0
पुणे : शुक्रवारी कर्जमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं शिबीर पार पडलं. या शिबीरात बोलताना अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *