Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक

1224 0

पुणे : केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

मोहोळ यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर २४ तासांच्या आत पुण्याशी निगडित तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढला. शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी अनेक दिवस प्रलंबित असलेले पुण्याचे नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भातील प्रश्न मांडले. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शाह यांनी तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मोहोळ यांना दिले.

याबाबत अधिक माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून आवश्यक असलेल्या आणि गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.’

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘पुणे शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता. शाह यांच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापानातून मिळालेल्या या निधीतून शहरभर विविध कामे केली जाणार आहेत. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, अशी मुद्दा बैठकीत मांडला असता त्यावरही शाह यांनी सकारात्मकता दर्शवली आणि तातडीने निधी वर्ग केला जाईल, असे सांगितले’

‘बे’वर रखडलेल्या ‘त्या’ विमानाचा प्रश्नही लवकरच मार्गी !
‘पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. शिवाय ही बे वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे चित्र आहे. हे विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असून, ते विमान तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली आहे,’ अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sunil Tatkare : ‘माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा’, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

Shina Bora Murder Case : शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृतदेहाचा सांगाडाच झाला गायब

Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर

Maharashtra Politics : विधानसभा जागांवरून भाजप -राष्ट्रवादीत होणार राडा; छगन भुजबळ यांनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News

Related Post

पुण्यातील तरुणाची अनोखी शिवभक्ती ! तब्बल 22 हजार 301 नाण्यांपासून बनवले शिवलिंग, गिनीज बुक मध्ये नोंद

Posted by - February 18, 2023 0
पुणे : पुण्यातील एका शिवभक्त तरुणांन अनोखी शक्कल लढवली आहे. आजपर्यंत अनेक वस्तूंपासून बनवलेले शिवलिंग तुम्ही पाहिले असेल, ऐकले असेल.…

पुणे तिथे गुन्हेगारही नाहीत उणे ! जेएम रोडवर महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी देणारे चौघं गजाआड; दोन आरोपी अल्पवयीन !

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढले. सर्रास रहदारीच्या रस्त्यांवर कोयते हॉकी स्टिक घेऊन, गुन्हेगार दहशत माजवण्याचा प्रयत्न…

ऐन सणासुदीत पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण ; पुन्हा होणार स्फोट, फुटणार खडक, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू !

Posted by - October 4, 2022 0
पुणे : 2 ऑक्टोबरला चांदणी चौकातील फुल पाडण्यात आला. त्यानंतर आता पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा असतानाच सोमवारी…

धक्कादायक!लॉजवर नेले आणि पत्नीचा खून केला..मित्रांना सांगताच बिंग फुटले

Posted by - June 15, 2024 0
पुणे : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नी च्या गळ्यावर वार करून खून केला, त्यानंतर पतीने लाॅज ला कुलूप लावून…

वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का… ; अखिलेश यादव यांचं सूचक ट्विट

Posted by - March 10, 2022 0
देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. पाच राज्यांच्या निवडणूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *