Pune News

Murlidhar Mohol : पुढीलवर्षी पुण्यामध्ये अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सवाचे आयोजन – मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

504 0

पुणे : पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत पुढील वर्षीपासून अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सव आयोजित करण्यात येणार असून, विविध देशांमधील बाल चित्रपट बघण्याची संधी पुण्यातील लहान मुलांना त्यामुळे मिळेल असे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आज घोषित केले.

‘सवांद पुणे’ तर्फे दि.19 ते 25 एप्रिल या कालावधीत सिटी प्राईड कोथरूड येथे आयोजित रौप्य मोहोत्सवी बालचित्रपट मोहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी ‘श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका करणारा बाल कलाकार शर्व गाडगीळ, ‘कोहिनूर’ ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर, कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे आणि जान्हवी कावरे, सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच सुनिल महाजन, केतकी महाजन बोरकर, प्रोग्राम डायरेक्टर विशाल शिंदे आणि प्रसाद मिरसदार देखील उपस्थित होते. या प्रसंगी केतकी महाजन बोरकर यांनी प्रास्ताविक केले तसेच लहान मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडून उद्घाटन केले गेले. लहान मुले व पालकांनी मोठी गर्दी केली होती.

माझी भूमिका असणारा ‘श्यामची आई’ चित्रपट बघायला माझे एव्हढे बालमित्र जमले आहेत हे बघून खूप आनंद झाला. बालचित्रपट मोहोत्सवातील सर्व चित्रपट हाउस फुल झालेत हे बघून भारी वाटले असे मत ‘श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका साकारणाऱ्या शर्व गाडगीळ यानी व्यक्त केले. कृष्कुमार गोयल म्हणाले की, आज ‘श्यामची आई’ चित्रपट बघायला आलेली सर्व लहान मुले भाग्यवान आहेत कारण या चित्रपट हिरो असणारा बाल कलाकार त्यांच्या सोबत आहे.

बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर म्हणाले की, असे चित्रपट मोहोत्सव वारंवार आयोजित व्हावेत कारण या चित्रपटातून चांगले संस्कार लहान मुलांवर होतात. कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे म्हणाले की, आज बाल चित्रपट बघायला आलेल्या लहान मुलांच्या पालकांना त्यांच्या पालकांनी बाल चित्रपट दाखवले होते हा वारसा असाच चालू राहिला पाहिजे. या चित्रपट मोहोत्सवात येणाऱ्या लहान मुलांना कावरे आईस्क्रिम तर्फे मोफत आईस्क्रिम दिले जाईल असे ते म्हणाले.

प्रारंभी संयोजक ‘संवाद पुणे’ चे अध्यक्ष सुनिल महाजन यांनी सर्वांचे स्वागत केले ते म्हणाले गेली 25 वर्षे मी बाल चित्रपट मोहोत्सव आयोजित करीत आहे. गेली 25 वर्षे पुण्यातील लहान मुले व त्यांचे पालक यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे मन भरून आले आहे. पुढील वर्षी अंतरराष्ट्रीय बाल चित्रपट मोहोत्सवासही पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास सुनिल महाजन यांनी व्यक्त केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Pune News : इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेमधून माघार

Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा

Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Related Post

Ankit Bawne

Ankit Bawne : क्रिकेटर अंकित बावणेचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी सहकार्य करार

Posted by - August 5, 2023 0
पुणे : महाराष्ट्राचा धडाकेबाज फलंदाज अंकित बावणे (Ankit Bawne) आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी जोडला गेला आहे. या दोघांमध्ये नुकताच सहकार्य…
Pune Crime News

Pune Crime News : प्रियकरासाठी उचलले लाखो रुपयाचे कर्ज; मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 16, 2023 0
पुणे : एकमेकांवर प्रेम असावं पण ते आंधळं नसावं. या आंधळ्या प्रेमापायी एखाद्याचे आयुष्यदेखील बरबाद होऊ शकते. याचाच प्रत्यय देणारी…
Pune News

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Posted by - December 28, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या डोळ्यादेखत एका 8 वर्षांच्या…

गुगलवर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नव्हे तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

Posted by - August 7, 2022 0
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून  महाराष्ट्रात मोठ्या सत्ता संघर्षानंतर भाजपच्या पाठींब्याने शिंदे सरकार स्थापन झालं खरं मात्र आता गुगलवर…

कोरोनाची पुन्हा भीती : “चीन मधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमणार का?” अजित पवारांचा सभागृहात सवाल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 21, 2022 0
हिवाळी अधिवेशन नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *