Sanjay Kakade

Sanjay Kakade : भाजपचे माजी खासदार संजय काकडेंच्या काकडे पॅलेसला महापालिकेचा दणका

409 0

पुणे : भाजपा नेते आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. हे बांधकाम येत्या 30 दिवसांत काढून घेण्यात यावे. अन्यथा महापालिकेकडून पाडण्यात येईल, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाबाबत माहिती अधिकारातून माहिती मागविण्यात आली होती. मात्र माहिती देण्यास पालिककेडून टाळाटाळ केली जात होती. असा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता. यानंतर पालिकेने याची दखल घेत काकडे पॅलेसच्या बांधकामाची पाहणी केली. यामध्ये दुसऱ्या मजल्यावर विनापरवाना 251 चौ. मी व तिसऱ्या मजल्यावरील 420 चौ. मी. चे संपूर्ण बांधकाम अनाधिकृत असल्याचे समोर आले. यानंतर महापालिकेने नोटीस जारी करत 30 दिवसांत सदरील बेकायदेशीर बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा दिला.

नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
PMC 

काकडे यांच्या मालकीच्या या इमारतीचे बांधकाम तब्बल 20 वर्षापूर्वी करण्यात आले आहे, अशी चर्चा रंगली आहे. .या इमारतीचा व्यावसायिक वापर होत असल्याचे पालिकेने नमुद केले आहे. एकीकडे सामान्य नागरिकांच्या छोट्याशा पत्र्याच्या शेडवर, टपऱ्यांवर बेधडक कारवाई पालिकेकडून करण्यात येते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या माजी खासदाराच्या अनाधिकृत बांधकामावर पालिका हातोडा चालवणार का? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. तसेच महापालिकेच्या या नोटिसीला संजय काकडे कितपत प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

नोटीसमध्ये काय म्हटले ?
महापालिकेने बुधवारी माजी खासदार संजय काकडे यांना नोटीस जारी केले आहे. यामध्ये दिलेल्या तपशील नुसार मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील 251 चौ.मी चे बांधकाम, तसेच मंगल कार्यालयाचा तिसऱ्या मजल्यावरील संपूर्ण बांधकाम 420 चौ. मी असे एकूण 671 चौ. मी. चे बांधकाम बेकायदेशिर असल्याचे नमुद केले आहे. अनधिकृत बांधकाम 30 दिवसांत काढून घ्यावे, तसेच मिळकत पूर्ववत करावी, असे आदेश पालिकेने काकडे यांना दिले आहेत. अन्यथा पालिका प्रशासनाकडून सदरील बांधकामावर कारवाई करण्यात येईल. तसेच यासाठी येणारा सर्व खर्च वसुल करण्यात येईल असे महापालिकेने आपल्या नोटीसमध्ये म्हंटले आहे.

Share This News

Related Post

राणा दांपत्याचा मुक्काम कोठडीतच ! २९ एप्रिल रोजी सुनावणी

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळालेला नाही. राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी…

Attack on MLA Uday Samant : “ही तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया”…! सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेतून सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया..

Posted by - August 3, 2022 0
पुणे : मंगळवारी रात्री पुण्यामध्ये कात्रज परिसरात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता . या…

लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्यावर बंदी घालण्यात यावी ; प्रशांत सदामते यांची मागणी

Posted by - December 22, 2022 0
लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्या अश्लिल कार्यक्रमुळे महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी आणि मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या…
Satyapal Malik

Satyapal Malik : ईडी, सीबीआयला घाबरण्याची गरज नाही, सत्यपाल मलिक यांचे वक्तव्य

Posted by - June 24, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रमुख विरोधी पक्षाची बैठक नुकतीच पाटण्यात पार पडली. यापुढे आम्ही केंद्र सरकार विरोधात आगामी…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘या’ प्रकरणी सीबीआय करणार चौकशी

Posted by - April 14, 2023 0
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आता सीबीआय आम आदमी पक्षाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *