Medha Kulkarni

Medha Kulkarni : जिवाभावाची माणसे कशी तोडू? नितीन गडकरींच्या भेटीनंतर मेधा कुलकर्णी यांचे सूचक वक्तव्य

726 0

पुणे : चांदणी चौकाच्या उद्धणपुलाच्या उदघाटनाच्या अगोदर भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. यामुळे (Medha Kulkarni) राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती.

काल म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा उदघाट्नचा सोहळा पार पडल्यानंतर नितीन गडकरी यांनी माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांच्यात काही वेळ चर्चादेखील झाली. या चर्चेनंतर मेधा कुलकर्णी यांनी आज फेसबुकवरून एक सूचक पोस्ट केली आहे.

मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या पोस्टमध्ये?
नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
ही खास पोस्ट तुमच्यासाठी.. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी..
गेले दोन दिवस तुम्ही माझ्यावर जो प्रेमाचा, आपुलकीचा, विश्वासाचा वर्षाव केला त्याची मी सदैव ऋणी आहे.
माझ्या राजकीय जीवनासंदर्भात ज्या गोष्टी घडल्या, गेली काही वर्ष साचलेल्या ह्या दुःखातील काही हे पर्वा प्रासंगिक निमित्ताने मांडले गेले. त्या माझ्या दुःखाशी तुम्ही समवेदना दर्शवली व आपल्या प्रतिक्रियांमधून आपली अनेक वर्षे जोडलेली नाळ कोणी अशी तोडू शकत नाही हे सिद्ध केलेत. पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातूनही अनेकांनी पाठींबा दिला. या आशीर्वादाची शिदोरी खूप बळ देऊन गेली आहे. तुमच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. सर्वांचे अगदी अगदी मनापासून आभार 🙏
माझ्याबरोबर वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माझ्या जुन्या जीवलग साथीदारांचे व माझी बाजू एका खुल्या मानाने ऐकून घेऊन माझ्या सत्याच्या लढाईत माझ्याबरोबर उभं राहणाऱ्या समस्त नागरिकांचे व भाजपाच्याही कार्यकर्त्यांचेही मी आभार मानते.
काल मा. नितीन गडकरी जी यांनी घरी येऊन विचारपूस केली, मा. देवेंद्र जी यांनी निरोप दिला. दोघेही पुढे वेळ देणार आहेत.
समाजात आपल्या लोकांसाठी काम करून काहीतरी सकारात्मक बदल आणायची इच्छा आहे, थोडी अधिक संधी हवी आहे, थोडा आपलेपणा… इतकेच.
काही समस्यांचे पक्षश्रेष्ठी काळजीपूर्वक निराकरण करतीलच.
पण ही पोस्ट खास तुमच्याचसाठी. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांचा पाठिंबा हीच माझी शक्ती.
धन्यवाद!

Share This News

Related Post

Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : “माझा फोटो परवानगीशिवाय वापरु नये”, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा…

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit…
Pune Firing

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Posted by - April 18, 2024 0
पुणे : आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा पुणे हादरलं (Pune Firing) आहे. दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे…

पिंपरीमध्ये रिक्षाचे भाडे देण्यावरून प्रवाशासोबत वाद; संतापलेल्या रिक्षा चालकाने थेट दगडाने….

Posted by - January 10, 2023 0
पिंपरी : पिंपरीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. रिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादातून रिक्षा चालक आणि संतापून प्रवाशाला थेट दगडाने…
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवल्याने भाजप कार्यकर्त्याला मारहाण

Posted by - March 8, 2024 0
बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *