Marathi Natya Sammelan

Marathi Natya Sammelan : 100 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलन शुभारंभ सोहळ्यानिमित्त पुण्यात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

478 0

पुणे : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात 5 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्याला स्वागताध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुगगंटीवार, निमंत्रक उदय सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी नाट्य परिषद पुणे शाखेचे विजय पटवर्धन,दीपक रेगे, समीर हंपी, सत्यजित धांडेकर,सुनील महाजन,अण्णा गुंजाळ,अशोक जाधव,चेतन चावडा, योगेश सुपेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, ५ जानेवारी २०२४ सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत भव्य अशा गणेश कला क्रीडा मंचावर अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, सकाळी ८ वाजता, पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीड़ा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ५०० दुचाकी आणि १० रथावर विराजमान झालेल्या ज्येष्ठ कलाकारांचा आणि १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या १०० पात्रांचा समावेश या रॅली मध्ये असणार आहे.

सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पुजन होऊन, कार्यक्रमांना प्रारंभ ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या सुरेल नाट्य संकीर्तनाने होणार आहे. सकाळी ११ वाजता, ३५ कलाकारांच्या साथीने डॉ. भावार्य देखणे यांचे ‘बहुरूपी भारुड’ सादर होणार आहे. दुपारी १२:३० वाजता “नाटक माझ्या चष्म्यातून” हा परिसंवाद होणार आहे, यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी आमदार उल्हासदादा पवार, सूर्यदता इन्स्टिट्‌यूटचे डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, पुणे ग्रामीण पोलीस सहअधीक्षक मितेश घट्टे सहभागी होणार आहेत याचे सूत्रसंचालन राजेश दामले करतील

दुपारी १:३० वा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि रेश्मा वर्षा परितेकर यांचा ४० नृत्यांगनाच्या संचासह पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी २:३० वा. दीडशेहून अधिक कलाकारांच्या ताफ्यात “छत्रपती शिवाजी महाराजांचा नयनरम्य शिवराज्याभिषेक सोहळा” संपन्न होणार आहेत. दुपारी ३ वा. २० गायक कलाकारांसह निनाद जाधव आणि रवींद्र खरे, “नाट्य धारा” हा नाट्य संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा शुभारंभ सोहळा पूर्वसंध्येला सायंकाळी ५ वा. होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि शंभराव्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,  सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाचे निमंत्रक आणि उद्‌योगमंत्री उदय सामंत विशेष अतिथि म्हणून ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल,  नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त शशी प्रभू, डॉ. रवी बापट, विश्वस्त  मोहन जोशी , अशोक हांडे, गिरीश गांधी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि नरेश गडेकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 6 वा. गायक राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांचा बहारदार नाट्य गीतांचा कार्यक्रम सादर होईल. आणि रात्री ८ वाजता, ५० प्रतिययश गायक वादक कलाकाराच्या साथीने, संदीप पाटील प्रस्तुत मराठी गीतांधी मुरेल संगीत रजनी लखलख चंदेरी” हा कार्यक्रम सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे, तरी अधिकाधिक पुणेकरांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मेघराज राजेभोसले यांनी केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 15 जखमी

Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Share This News

Related Post

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, सहा महिलांची सुटका

Posted by - April 13, 2022 0
पुणे – मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ‘ओरा स्पा’ सेंटरवर पोलिसांच्या सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत स्पा…
Kamal Pardeshi

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Posted by - January 3, 2024 0
पुणे : उद्योग क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. छोट्याशा खेडेगावातून उद्योगाला सुरूवात करून जगभर ‘अंबिका मसाला’ ब्रँड पोहोचविणाऱ्या…
Pune News

Pune News : धक्कादायक ! खराडीत खासगी स्विमिंग पुलात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

Posted by - April 16, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) खराडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खासगी स्विमिंग पुलात बुडून 13 वर्षीय…

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, 13 मे पर्यंत कोठडीतच

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुक्काम आणखी काही दिवस कोठडीतच असणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या कोठडीत…

देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार – प्रकाश जावडेकर

Posted by - January 30, 2022 0
देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *