रमणबाग प्रशालेत मराठी दिन साजरा

410 0

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मराठी भाषा दिन आणि शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या ७५ साहित्यिकांच्या हस्तलिखितांचे प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

शालाप्रमुख सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका अर्चना पंच, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, दिलीप रावडे, मराठीच्या शिक्षिका ऋचा कुलकर्णी, शुभांगी पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी ही संस्कृतोद्भव भाषा असून तिचे वैभव जाणून घ्यावे, मराठी भाषेमुळे उच्चाराचे वळण जिभेला लागते. इंग्रजीच्या वाघिणीचे दूध पचविण्यासाठी मातृभाषा नीट समजणे गरजेचे असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.

इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी ७५ साहित्यिकांच्या माहितीचे संकलन केले. शांता शेळके, वसंत बापट, बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विविध साहित्य प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षक मोहन शेटे यांनी मार्गदर्शन केले.

Share This News

Related Post

पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने ८८ आस्थापनांवर कारवाई

Posted by - November 10, 2022 0
पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व…
Odisha Train

ओडिशा रेल्वे दुर्घटनेचे कारण आले समोर; रेल्वे मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Posted by - June 4, 2023 0
बालासोर : ओडिशाच्या (Odisha) बालासोर इथे शुक्रवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस (Shalimar-Chennai Central Coromandel Express) आणि…

Pune Fire : मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून 5 जणांची सुटका

Posted by - March 2, 2024 0
पुणे : काल मध्यरात्री 1.48 वाजता गंगाधाम फेज 02, विंग जी -05 येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग (Pune Fire) लागल्याची…

MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण आता घटनापिठाकडे ; 25 ऑगस्टला होणार पहिली सुनावणी

Posted by - August 23, 2022 0
MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद आता पाच सदस्यीय घटना पिठाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे या सत्ता…

नाना पटोले आणि बच्चू कडू यांचे फोन कोणाच्या नावाने टॅप झाले ? गृहमंत्र्यांनी दिली माहिती

Posted by - February 26, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *