माणिकचंद ऑक्सिरीच बनावट लेबल लावणार्‍या ‘ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा

535 0

 

पुणे: नामांकित मिनरल वॉटर ’ माणिकचंद ऑक्सिरिच’ या कंपनीच्या पाण्याच्या बाटलीवरील लेबल सारखे बनावट लेबल तयार करून पाण्याच्या बाटल्यांची विक्री ’ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार मे 2023 मध्ये वाकी खुर्द, चाकण येथे उघडकीस आला.

याप्रकरणी माणिकचंद ऑक्सिरिच मिनरल वॉटर तयार करणार्‍या आरएमडी फुड्स अँड बेव्हरेजस या कंपनीच्या संचालिका शोभा रसिकलाल धारीवाल (68, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऑक्सिटॉप कंपनीचा मालक महेंद्र गोरे (रा. वाकीखुर्द, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा धारिवाल यांना मे 2023 मध्ये आपल्या कंपनीच्या लेबल सारखे हुबेहूब लेबल असलेल्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री विविध ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता या बनावट पाण्याची बाटली महिंद्रा ऑक्सिटॉप कंपनीची असुन ही कंपनी आरोपी महेंद्र गोरे याची असल्याचे समजले.

त्यावर त्यांनी अधिक माहीती घेण्यासाठी व्यापार विभागाशी संपर्क साधला असता आरोपीने कोणतीही ट्रेड मार्क मान्यता घेतली नसल्याचे समोर आले. आरोपी गोरे याची महिद्रा एन्टरप्रायजेस ही कंपनी उत्पादित करीत असलेल्या बाटलीवर जाणीवपूर्वक माणिकचंद ऑक्सिरिच कंपनी सारखे लेबल (अक्षरांची साईज, फॉन्ड व अक्षरांची ठेवण कलर) चिटकवून ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

अल्पसंख्याक महिलांसाठी बचत गटाची निर्मिती होणार; राज्य सरकारचे भाजपाच्यांच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या कडून अभिनंदन

Posted by - October 27, 2022 0
अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी नवीन २ हजार बचत गटांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्याच बरोबर, ‘माता सुरक्षित तर…
University Of Pune

University of Pune : पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून कारवाईची प्रक्रिया सुरु

Posted by - November 3, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

पुणे : अग्निशमन दलाच्या मुख्यालयात ‘संविधान दिवस’ निमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन

Posted by - November 26, 2022 0
पुणे : भारतीय संविधान ज्या दिवशी स्वीकारले गेले, तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस “संविधान दिवस” म्हणून साजरा…

विधानसभेचे विशेष अधिवेशन पुढं ढकललं! आता ‘या’ तारखेला होणार अधिवेशन

Posted by - July 1, 2022 0
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *