एनओसी नूतनीकरण परवाना बंधनकारक करा; पुणे महापालिकेनं धाडलं अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्र

322 0

अन्न परवाना नूतनीकरण करण्यासाठी व्यावसायिकांना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करावं, असं पत्र महापालिका आयुक्तांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पाठविले आहे.

शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवाने दिले जात होते. असे परवाने देताना पाणीपुरवठा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक होतं. महापालिकेकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मीटरने पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे व्यावसायिकांकडून पाणीपट्टी नियमित भरली जात असे. मात्र सध्या असे परवाने आणि त्याचं नूतनीकरण एफडीएकडून करण्यात येत असल्यामुळे व्यावसायिकांकडून महापालिकेची पाणीपट्टी थकबाकी ठेवली जात आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पत्र पाठवून अन्न परवाना नूतनीकरण करण्यासाठी व्यावसायिकांना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक करावे अशी मागणी केली आहे.

Share This News

Related Post

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर

Posted by - April 7, 2022 0
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले असून काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ

Posted by - March 18, 2024 0
पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार…

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात

Posted by - January 30, 2022 0
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.…

PHOTO : मंगलमय वातावरणात ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान

Posted by - August 31, 2022 0
पुणे : मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात…

व्यवसायिकाकडून 12 लाखांची लाच घेतल्याचा आरोप! सहायक पोलिस आयुक्तासह पोलिस अंमलदारावर गुन्हा दाखल

Posted by - March 28, 2023 0
सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अन् सध्या पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलिस अंमलदार विजय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *