Dagdusheth Ganpati

Chandrayaan 3 : चंद्रयानच्या यशस्वी लँडिंग साठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

932 0

पुणे : भारताची चंद्रयान (Chandrayaan 3) मोहीम यशस्वी व्हावी या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे या साठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला यासाठी दूध दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला. आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान (Chandrayaan 3) चंद्रावर उतरणार आहे त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे यासाठी हा अभिषेक करण्यात आला याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली.

चांद्रयान 3 च्या चंद्रावर लॅंडिंगची वेळ आता जवळ आली आहे. चांद्रयान बुधवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. चांद्रयान 2 च्या अयशस्वी प्रयत्नानंतर आता या मोहिमेकडून इस्रोला बऱ्याच अपेक्षा आहेत. या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयानाने14 जुलैला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते.

चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या शक्तीपेक्षा सुमारे सहा पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यातच इस्रोने चांद्रयानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकलेले नाही. नुकतेच 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले. त्यामुळे आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल.

Share This News

Related Post

मोठी बातमी : डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात तुफान राडा (VIDEO)

Posted by - August 2, 2022 0
कल्याण : शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला आहे. शिंदे समर्थक…

फडणवीस 10-20 पवार खिशात घेऊन फिरतात – गोपीचंद पडळकर

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपानं दणदणीत विजय प्राप्त केला असून भाजपा कार्यकर्त्यांकडून…
Ashish Deshmukh

Top News Special Political journey of Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांशी वाद ते पुन्हा भाजपावापसी; कसा आहे आशिष देशमुखांचा राजकीय प्रवास?

Posted by - June 18, 2023 0
पुणे : आशिष देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं सातत्यानं चर्चेत असलेले नाव. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आज पुन्हा एकदा भाजपावासी झाले असून…

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याची अटक बेकायदा

Posted by - February 27, 2023 0
पोलीस अधिका-यांनी वरिष्ठांच्या कायदाबाह्य आदेशांना नाही म्हणायला शिकायला हवं. शक्य नसेल तर किमान तश्या लेखी आदेशांची मागणी करावी. असं महत्त्वपूर्ण…
murlidhar mohol

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *