मोठी बातमी! पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द

900 0

पुणे: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं  पुण्यातील ‘रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करत 22 सप्टेंबर 2022 पासून बँकिंग कामकाज बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सन २०१७ च्या हायकोर्टाच्या आदेशानुसार रिझर्व्ह बँकेनं रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं आता सहा आठवड्यांत बॅंकेचे व्यवहार होणार बंद आहेत. बँकेत अनेकांचे पैसे अडकल्याने ठेवीदारांनी दिर्घ काळासाठी लढा दिला होता. पण बँकेच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच लायसन्स रद्द झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा परवाना रद्द केला, हे फारच दुर्दैवी आणि अनाकलनीय असून गेल्या ३ वर्षात विविध बँकांमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि  रिझर्व्ह बँकेला अनेक निवेदने दिली, मात्र दुर्दैवाने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आतासुद्धा आम्ही एक मोठे गुंतवणूकदार मिळवले आहेत, जे बँक घेऊ शकतात, मात्र परवाना रद्द करून रिझर्व्ह बँकेने सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवले अशा शब्दात रुपी बँक ठेवीदार हक्क समितीचे भालचंद्र कुलकर्णी यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

Share This News

Related Post

भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट*

Posted by - September 11, 2023 0
पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे…
Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून युवासेनेला बळकटी ! ‘या’ 3 शिलेदारांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.…

शेकडो बालगोपाल, हजारो तरुणाई व सेलिब्रेटींच्या उपस्थितीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाची सांगता

Posted by - September 7, 2023 0
पुणे : मंगलमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत, शेकडो बालगोपालांसह तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी…
Maharashtra ATS

Maharashtra ATS : ठाण्यातून एका गुप्तहेराला अटक; ATS ची मोठी कारवाई

Posted by - December 13, 2023 0
ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला (Maharashtra ATS) अटक…

देवेंद्र फडणवीस आपल्याच ‘ओएसडी’ यांना का आणत आहेत सक्रिय राजकारणात ?

Posted by - June 11, 2023 0
  नुकतीच भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा, विधानसभानिहाय्य निवडणूक प्रमुखांच्या निवडी जाहीर करण्यात आला असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राहिलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *