सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेला बिबट्या जेरबंद

331 0

पुणे – तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department ) यश आले आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या बंद करण्यात आले.

चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीत पहाटेच्या सुमारास बिबट्या घुसल्याचे कंपनीच्या सुरक्षारक्षकाला आढळून आले. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेले नाही. नर जातीचा अडीच वर्ष वयाचा हा बिबट्या आहे. या बिबट्याला आता पुन्हा दूर नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

नागरिकांवर हल्याची प्रकरणे

यापूर्वी जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर याभागात बिबट्या शेतात तर कधी कोंबड्याच्या खुराडयात , विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. एवढं नव्हे तर पाळीव प्राण्यांना फस्त करण्याबरोबरच , लहानमुलांसह नागरिकांवरही हल्ले केले आहेत. याबरोबरच पुण्यातील कात्रज बोगद्या येथेही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण तसेच उसाच्या शेतीमुळे मागील काही वर्षात बिबट्याचा अधिवास वाढला आहे.

Share This News

Related Post

ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलींग सापडल्याचा दावा ! कोर्टानं दिला महत्वाचा आदेश

Posted by - May 16, 2022 0
नवी दिल्ली- वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. या दाव्यानंतर कोर्टानं ज्या जागेवर शिवलिंग…
Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Posted by - June 13, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज…
ED

पिंपरी चिंचवड : सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ED चे छापे ; 400 कोटींहून अधिकचा घोटाळा

Posted by - January 27, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने आज सकाळपासून छापे टाकले…

रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पुन्हा मास्क सक्ती

Posted by - May 11, 2022 0
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रश्नांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी पत्र जारी…
Nasik

लग्नावरून परतताना कार नदीत कोसळून भीषण अपघात; चिमुकलीसह 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 30, 2023 0
नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या नांदगाव-मालेगाव मार्गावर हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *