जुन्नर तालुक्यात एकाच दिवशी बिबट्याचा चार जणांवर हल्ला

403 0

जुन्नर- जुन्नर तालुक्यात मंगळवारी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 2 महिला आणि 2 पुरुष जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या ठिकाणी एका यवकावर आणि जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी एका युवकावर बिबट्यांची हल्ला केला. खेड तालुक्यातील रेटवडी येथील महिलांच्या डोक्यात, तोंडावर बिबट्याने पंजा मारला आणि चावा घेतल्याने दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. अरुणा संजय भालेकर, रिजवना अब्दुल पठाण अशी या महिलांची नावे आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या हल्ल्यात सर्वजण जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.उन्हाळा वाढत असल्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share This News

Related Post

गणपती विसर्जन मिरवणूक : पोलीस प्रशासनाचे नियोजन फसले ? मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Posted by - September 10, 2022 0
पुणे : कोरोना काळामुळे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . कालपासून सुरू असलेल्या…

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली, राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने कारावासाची शिक्षा

Posted by - February 11, 2022 0
अमरावती- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याबद्दल राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने कारावासाची शिक्षा आणि 25…

बांधकाम साइटवर काम करत असताना पाय घसरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; बिल्डर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल

Posted by - October 19, 2022 0
पुणे : कोंडव्यातील टिळेकरनगर मधील द्वारिकाधाम सोसायटीमध्ये चालू असलेल्या इमारतीच्या साइटवर काम करत असताना एका कामगाराचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी…

पावसाळी अधिवेशन : खड्ड्यांचे खोके… मातोश्री ओके…! सत्ताधाऱ्यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

Posted by - August 25, 2022 0
मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान अनेक वादविवाद , आरोप-प्रत्यारोप आणि धक्काबुक्की नंतर आज पुन्हा सत्ताधाऱ्यांनी विधान…

ASHISH SHELAR : “जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यायचा असल्यास द्यावा; आम्ही ती जागा लढवून जिंकू…! “

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : हर हर महादेव चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई आणि आता पुन्हा एकदा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *