Corona Scam

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

330 0

पुणे : महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात (Corona Scam) वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये कोविड काळात 80 ते 90 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. हा सगळा घोटाळा कोरोना काळात कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे या ठिकाणी घडला आहे.

या घोटाळ्याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश बाबुराव कोळुसरे (वय 42, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. डॉक्टर तारडे डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी आपापसात संगणमत केले. कोविड काळामध्ये कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये कोविड तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले होते. यामध्ये टेस्टिंग किट, सॅनिटायझर, औषधे यांचा समावेश होता.

या सर्वांनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी अन्यसाथीदारांना हाताशी धरून सरकारी कागदपत्रांमध्ये अनेक फेरफार केले. खोटी कागदपत्रे तयार करून खरी असल्याचे भासवले. ही कागदपत्रे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेला सादर करून पैसे कमावण्याच्या हेतूने कोविड टेस्ट तपासणीसाठी येणाऱ्या लोकांच्या नोंदवहीमध्ये खोट्या नोंदी केल्या. नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किड्स वापरल्या असल्याचे भासविण्यात आले. यानंतर त्या टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खाजगी व्यक्तींना विकल्या. त्यामधून जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची कमाई केली असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जैतापूरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News

Related Post

पुण्याची प्रभाग रचना पुन्हा नव्यानं! तीन की चार सदस्यीय असेल प्रभाग रचना याबाबत मात्र संभ्रम !

Posted by - November 23, 2022 0
महाराष्ट्र : पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिका निवडणुकांसाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्यानं करण्याचे आदेश राज्य सरकारने…

‘महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरपला’ मान्यवरांची श्रद्धांजली

Posted by - March 29, 2023 0
पुण्याचे खासदार गिरीश बापट (वय ७२) यांचे निधन झाले. गिरीश बापट यांनी दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या…

पुण्यात विकृतीचा कळस : प्रमोशनसाठी बॉस सोबत संबंध ठेवायला सांगत होता पती; सासू, दीर आणि पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - February 24, 2023 0
पुणे : एक गंभीर प्रकरण पुण्यातून उघडकीस येत आहे. एका 42 वर्षे महिलेने आपल्या पती आणि सासरकडच्यांविरुद्ध गंभीर आरोप केले…
Bhiwandi News

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Posted by - April 3, 2024 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत भिवंडीत चाकू हल्ला करण्यात…

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पाच तरुणींची सुटका तर एकाला अटक

Posted by - April 17, 2023 0
पुण्यातील वानवडी फातिमानगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *