Kishor Awarae

Kishore Aware : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ धक्कदायक खुलासा

1010 0

पुणे : पुणे येथील तळेगाव या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (kishore aware) यांच्यावर गोळीबार आणि वार करण्यात आले होते. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करून गौरव भानू खळदे (रा. तळेगाव)(Gaurav Bhanu Khalde) याला अटक केली आहे. त्याने या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

माजी नगरसेवक भानू खळदे (Bhanu Khalde) आणि किशोर आवारे यांचा जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मुलगा गौरव याच्या मनात होता. त्यातूनच त्याने इतर आरोपींना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गौरव भानू खळदे याच्या अगोदर शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 32, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) यांना अटक केली होती. या सगळ्या आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात (Vadgaon Maval Court) हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Share This News

Related Post

राज्यातील अवयवदानाचा टक्का वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

Posted by - March 17, 2022 0
राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा,…

CRIME NEWS : नवरा बायकोच्या भांडणात मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला ; हल्लेखोरांकडून हवेत गोळीबार ? मालेगावात थरार…

Posted by - September 28, 2022 0
मालेगाव : मालेगावमध्ये घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मालेगावातील सर्वे नंबर 55 च्या निहाल नगर भागामध्ये…
Chandrapur News

Chandrapur News : खळबळजनक ! घात कि अपघात ? दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा अचानक आढळला मृतदेह

Posted by - October 26, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted by - July 9, 2022 0
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित…

आजपर्यंतचा सर्वात भन्नाट व्हिडीओ : थेट जॉली एलएलबी-2 सारखी कॉपी, मुलं पास व्हावीत म्हणून पालकांनी अशी पोहोचवली उत्तर, पुढे काय होणार ?

Posted by - March 8, 2023 0
सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित तर व्हालच, पण तुमचे हसणे ही थांबवू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *