किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणी शिवसैनिकांना जामीन मंजूर

201 0

पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना 3000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज सकाळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह इतर शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय आहे प्रकरण ?

भाजप नेते किरीट सोमय्या हे शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये पोहोचले होते. नेमक्या त्याच वेळी पुण्यातील शिवसैनिक पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारासंबधी निवेदन किरीट सोमय्यांना देण्यासाठी जमले होते. यावेळी मोठा गोंधळ झाला. त्या गोंधळात किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले.त्यांच्या माकडहाडाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

झाल्याप्रकरणी किरीट सोमण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील तार केली आहे . तसेच ते राज्यपातांची भेट घेणार आहेत . गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलिस शोध घेत होते . यामुळे शहर प्रमुख अनेक शिवसैनिक स्वताहून पोलिसांत हजर झाले आहेत . या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे .

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी पुण्यातील घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडे या प्रकरणाचा रिपोर्ट मागवणार असून येत्या काही दिवसात गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

Share This News

Related Post

बुलढाणा : मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत पोलिसांनीच ठोकरले तीन वाहनांना; वाचा सविस्तर

Posted by - November 19, 2022 0
बुलढाणा : बुलढाणामध्ये एका विचित्र अपघातात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये जीवित हानी झाली नसली तरी धक्कादायक…

पुतीन यांच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे तरुणीला फुटला अश्रूंचा बांध

Posted by - March 15, 2022 0
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. मोठमोठ्या कंपन्यांना या युद्धाची झळ बसत आहे. अनेक कंपन्यांनी…

जनकल्याण योजना : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण शेळी-मेंढी पालनातून उद्योजकता विकास ; योजनेचे स्वरुप , अटी , लाभ

Posted by - September 12, 2022 0
योजनेचे स्वरुप ग्रामीण शेळी- मेंढी क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास करणे, शेळी मेंढी व्यवसाय मॉडेल विकसित करणे, असंघटित क्षेत्राला संघटित क्षेत्रात आणून…

उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरे तोफ

Posted by - March 5, 2023 0
रत्नागिरी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच आज र (विवार दि. 5 मार्च) रोजी खेड येथे…
Vasant More

Vasant More : वसंत मोरे यांच्या विविध नेत्यांसोबतच्या भेटीत नेमकं होतं तरी काय ? TOP NEWS ची INSIDE STORY

Posted by - March 29, 2024 0
पुणे : मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय… वसंत मोरे यांनी कायमच भाजपला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *