नाराजी बाजूला सारून जगदीश मुळीक यांनी घेतली मुरलीधर मोहोळांची गळाभेट

400 0

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त होती. या जागेवर नवा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचे पुढे लोकसभेचे उमेदवार कोण असणार ?, पुण्यातील लढत कोणामध्ये होणार याची देखील पुणेकरांना उत्सुकता होती. महायुतीतील अनेक नावे चर्चेत होती मात्र महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली.

 

मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील इतर इच्छुकांमध्ये मात्र नाराजीचा वातावरण पाहायला मिळाले. माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील लोकसभेच्या शर्यतीत होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे जगदीश मुळीक नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जगदीश मुळीक यांनी कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमांनाही हजेरी लावली नाही. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यालयात भाजपचा सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा करण्यासाठी हजेरी लावली होती यावेळीही जगदीश मुळीक गैरहजर होते. तसेच दुसऱ्या दिवशी कसबा गणपतीचं दर्शन घेऊन मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ फोडला यावेळीही मुळीक उपस्थित नसल्यामुळे त्यांची नाराजी उघड झाली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्टही केली होती. मात्र तरीही ही नाराजी बाजूला सारत त्यांनी आज महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची गळाभेट घेतली.

मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आज जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी मुळीक यांच्या कुटुंबीयांनी मोहोळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे औक्षणही केले. यादरम्यान या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. या क्षणाची छायाचित्रे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र मुळीक यांची नाराजी खरंच दूर झाली आहे का की पक्षाची एकजूट दाखवण्यासाठी ही भेट घेतली गेली याबाबत शंका आहे. त्याचबरोबर येत्या काळात जगदीश मुळीक आपली नाराजी बाजूला सारून पक्षाबरोबरचे निष्ठा कायम ठेवत मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत प्रचार करताना पाहायला मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share This News

Related Post

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : ‘तुमच्या डोक्यात लोचा झाला…’, ‘त्या’ पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर पलटवार

Posted by - January 25, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकासआघाडीच्या नेत्यांची (Prakash Ambedkar) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे…

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या ११ व्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त संकलित

Posted by - April 12, 2022 0
पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त…

ब्रेकिंग न्यूज ! ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी

Posted by - March 7, 2022 0
प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार घेणार असून सर्वपक्षीय बैठकीत निर्णयावर एकमत देण्यात आले. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ…

माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Posted by - January 24, 2023 0
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची…
Ketki Chitale

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Posted by - May 23, 2024 0
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या संपूर्ण देशात गाजत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडताना दिसत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *