कात्रज मेट्रोला निधी कमी पडू देणार नाही:अजित पवार

433 0

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहारत विकास कामाच्या उद्घाटनाला वेग आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील उदघाट्नच्या कार्यक्रमांना सुरूवात केली आहे. यावेळी कात्रज मेट्रोसाठी राज्य सरकारकडून पूर्ण प्रयत्न करणार येतील कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. मात्र, केंद्राने सुद्धा प्रयत्न करायला हवेत.म्हणजे कात्रज मेट्रो लवकर होईल असे कात्रज येथे अजित पवार म्हणाले.

नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या प्रयत्नातून कात्रज डेअरी ते वंडरसिटी सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ पथ या २५ वर्षे प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अजित पवार यांच्यामुळेच हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगत रस्त्यासह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण आणि ४५ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन होत असल्याचे सांगितले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, नगरसेवक विशाल तांबे, प्रकाश कदम, नगरसेविका अमृता बाबर, स्मिता कोंढरे, आप्पा रेणूसे नानासाहेब बेलदरे आदीसह नागरिक उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अनेक दिवसानंतर मी या परिसरात आलो आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या रस्त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवराज बेलदरे आणि सर्वांचे अभिनंदन! कात्रज दूध उत्पादक संघाच्या सहकाऱ्यांसोबत बोलून सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. ज्यावेळी ही जागा डेअरीला दिली. त्यावेळी नागरीकरण कमी होते आता वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या कररुपी पैशांचा वापर व्यवस्थित करून अशी दर्जेदार कामे करायला हवीत. आपला परिसर स्वच्छ ठेवा कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा. केवळ महापालिका, केंद्र सरकार, राज्य सरकार काही करू शकत नाही. लोकांचेही सहाय्य हवे. असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले ते पुढे म्हणाले, कृपा करून स्वतः कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावा. उघड्यावर कचरा टाकू नका असे आवाहनही यावेळी पवार यांनी यावेळी केले. त्याचवेळी कात्रजला आणखी कशा पायाभूत सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच वाढत्या नागरिकिकरणाच्या पार्श्वभूमीवर पाणी, रस्ते, वीज, उद्याने क्रीडांगणे, स्मशानभूमी अशा मूलभूत सुविधांवर काम करण्यात येईल. या सुविधा देण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचा विश्वास पवार यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; दोन गंभीर जखमी

Posted by - November 18, 2022 0
मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर रात्री १२च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जण ठार झाले आहेत. तर दोघा…

सहा कोटी रुपयांची वीज चोरी, बापलेक असे करायचे विजेची चोरी

Posted by - May 14, 2022 0
ठाणे- तब्बल सहा कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या पितापुत्राच्या विरोधात मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बापलेकाने गेल्या 29…
Vijay Shivtare

Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड

Posted by - March 11, 2024 0
पुरंदर : बारामती (Baramati Loksabha) लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित आहे तर राष्ट्रवादी…

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Posted by - May 27, 2024 0
पुणे : पुण्यतील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने (Pune Porsche Car Accident) म्हणजेच वेदांत अग्रवालने रविवारी (19 मे…

सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Posted by - March 24, 2023 0
सांगली: यावर्षी सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *