कात्रज गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी चौघांना अटक

455 0

पुणे- पुणे शहरातील कात्रज परिसरात काल मंगळवारी एका अनधिकृत गॅस गोडाऊनला भीषण आग लागली होती. या ठिकाणी लागलेल्या आगीने 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले होते. या प्रकरणी गोडाऊन मालक आणि जागा मालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या सिलिंडरच्या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला होता. गोडाऊन मालक सागर संदीप पाटील, जागामालक दत्तात्रय काळे, सोनू मांगडे आणि संपत सावंत अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा केला होता. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान टाक्यात गॅस रिफिलिंग केला जात होता. काल मंगळवारी या ठिकाणी आग लागली. यामध्ये 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. यामध्ये स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. या आगीमध्ये फुटलेल्या अनेक गॅस सिलेंडरच्या टाक्या आजूबाजूचा घरावर पडून घराच्या काचा फुटल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पोलिस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला दिली भेट

Posted by - September 21, 2023 0
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari…
Nana Patole And Balasaheb Thorat

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Posted by - May 4, 2024 0
धुळे : लोकसभा निवडणुकीचे सध्या 2 टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी होणार आहेत. मात्र त्या…

PUNE CRIME NEWS : सिबिल स्कोअर खराब असणाऱ्यांना व्यावसायिक कर्ज देण्याचं आमिष दाखवून फसवणूक ; तिघांना बेड्या…(VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
पुणे : सिबिल खराब असणाऱ्या लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देतो, अशी सोशल मीडियावर जाहिरात करून लोकांची…
Pune News

Pune News : राममंदिरानंतर आता पुणेकरांना पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे : सुनील देवधर

Posted by - February 11, 2024 0
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभे राहू शकले असून, ज्याप्रमाणे देशाला राम मंदिर मिळाले, त्याप्रमाणे पुणेकरांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *