कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी असे आहेत वाहतुकीतील बदल

351 0

पुणे- कर्वे रस्त्यावर बांधण्यात आलेल्या दुमजली उडडाणपुलामुळे वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र येथील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. म्हणूनच कर्वे रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी आता काही प्रायोगिक बदल केले जाणार आहेत.

१३ मार्चला या उड्डाणपुलाचे उदघाटन झाले. मात्र वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत उड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडीबद्दल; तसेच त्यावरील उपाययोजनांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही प्रायोगिक बदल करण्याचे निश्चित करण्यात आले. हे बदल पुढील काही दिवसांत अमलात येतील आणि दहा ते पंधरा दिवसांसाठी लागू केले जातील. त्याचे परिणाम पाहून पुढे या बदलांना अंतिम स्वरूप दिले जाईल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ‘पीएमपी’चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, महापालिका, महामेट्रो; तसेच वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

असे असतील प्रायोगिक बदल…

– खिलारेवाडी आणि मेहेंदळे गॅरेज चौकाकडून आलेल्या चारचाकी वाहनांना शंकरराव जोशी मार्ग (हॉटेल निसर्ग) कर्वे रस्त्याकडे बंदी असेल. या वाहनांना नळस्टॉप चौकात येऊनच कर्वे रस्त्याकडे जावे लागेल. या रस्त्यावर केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जाईल.

– एसएनडीटी येथील एसटी महामंडळ आणि पीएमपीचा बसथांबा कर्वे रस्त्यावर दशभुजा गणपतीजवळ स्थलांतर केला जाईल. रिक्षांनाही येथे थांबण्यास बंदी असेल.

– उड्डाणपुलावरून उतरताना पौडफाट्याच्या उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका (बॅरिकेडिंग लेन) असेल. तर अभिनव (नळस्टॉप) चौकातून कर्वे रस्त्याने आलेल्या वाहनांना डाव्या बाजूने पौड रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर जाता येईल.

– व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्किंग’ सुविधा उपलब्ध केली जाईल.

– उड्डाणपुलावरून कर्वे रस्त्याकडे आल्यानंतर ‘रेस्कॉन’ कंपनीकडे वळण्यास वाहनांना बंदी असेल.

Share This News

Related Post

घरगुती गॅसचे दर वाढताच रूपाली पाटील ट्विट करून म्हणाल्या… BJPहटाओ देश बचाओ

Posted by - May 7, 2022 0
पुणे- एकीकडे दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या दरामध्ये 50 रुपयांची…

… ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उध्दव ठाकरे अरविंद केजरीवालांवर टीका

Posted by - June 23, 2023 0
2019 मध्ये 17 पक्षांची मिसळ पार्टी झाली होती. आता अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे दोन चेहरे वाढले आहेत. असे…

सप्टेंबर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘या’ विधानानं राज्यात खळबळ

Posted by - August 19, 2023 0
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा करत असून आता सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल असा दावा…

वीज प्रकल्पांना येणार गती ; वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

Posted by - October 12, 2022 0
मुंबई : अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर चक्क माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक

Posted by - May 28, 2022 0
पुणे- पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. विविध संघटनांनी याबाबत आक्षेप नोंदवला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *