‘अजून सुतक संपले नाही तोवरच….’, जगदीश मुळीक यांच्या पोस्टरबाजीवर खरमरीत टीका

608 0

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाला तीनच दिवस झाले अजून सुतक संपले नाही तोवरच काँग्रेस आणि भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघावर आपला हक्क दाखवला आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात त्यांच्या समर्थकांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर जगदीश मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला आहे.

तब्बल चार दशकं पुण्याच्या राजकारणावर छाप असणारा नेता गेल्याने संपूर्ण शहर शोकाकुल आहे. पुणे शहराच्या राजकारणातील बापट हे अविभाज्य नाव होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहर भाजपची मोठी हानी झाली आहे. एक जाणकार, अभ्यासू, मतदारसंघातील जनतेच्या मनामध्ये विश्वास असणारा नेता, सर्व पक्षातील नेत्यांबरोबर मित्रत्वाचे संबंध असणारा नेता अशी बापट यांची ओळख सांगता येईल. असा नेता आपल्यातून जाऊन तीन दिवस उलटत नाही तोवरच त्यांच्याच पक्षातील उत्साही कार्यकर्त्यांनी भावनाशून्य मानाने पोस्टरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे.

काल काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर आता भाजपने त्यावर कडी करत चक्क पोस्टरबाजी केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आज वाढदिवस. बापट गेल्याचे दुःख पाहून कोणतीही जाहिरातबाजी न करता वाढदिवस सध्या पद्धतीने करण्याची गरज होती. पण अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कोणताही विधिनिषेध न बाळगता जगदीश मुळीक यांचा उल्लेख थेट भावी खासदार म्हणून केला. आता त्यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जाऊ लागली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जगदीश मुळीक यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. १० दिवसांचे सुतक तर संपु द्या, मग लावा बॅनर. का तुम्ही वाटच बघत होतात ? आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळेपणा ? बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत, तोवरच तुम्ही पॅड घालून तयार, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू द्यायची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा, असे ट्विट राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी केले आहे.

अजित पवार यांनी वडेट्टीवारांना झापले

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढणार असं विधान करून वाद निर्माण केला. त्यांच्या या विधानावर अजित पवारांनी वडेट्टीवार यांना चांगलेच सुनावले. अजित पवार म्हणाले,” हे बघा, लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अजून गिरीश बापट जाऊन फक्त तिसरा दिवस आहे. एवढी कसली घाई आहे? माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही? काही परंपरा महाराष्ट्राची आहे की नाही. लोक काय म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही ? ” अशा शब्दात विजय वडेट्टीवारांना फटकारले

Share This News

Related Post

Satara Accident

Satara Accident : सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे..

Posted by - September 27, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून…
Kolhapur Suicide News

Kolhapur Suicide News : स्वतःची चिता रचून मरणाला कवटाळले; वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले

Posted by - June 22, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Suicide News) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका…
Anis Sundke

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 17, 2024 0
पुणे : अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके…
Crime News

Crime News : महाराष्ट्र हादरला ! शिक्षकदिनादिवशीच शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

Posted by - September 5, 2023 0
नांदेड : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. मात्र…

राज ठाकरे यांना ‘चुहा’ म्हणणारे बृजभूषण शरण सिंह आहेत तरी कोण ?

Posted by - May 10, 2022 0
नवी दिल्ली- भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *