पुण्यात 21 ते 26 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा

348 0

पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पर्धा समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

बुधवारी मुंबईत ह्या स्पर्धेच्या मानचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्पर्धेचे प्रमुख पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, रोलबॉल ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष ऍड.अमोल काजळे पाटील,मुंबई रोलबॉल संघटनेचे सचिव जयप्रकाश सिंग आणि चंदन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यात होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे पुण्याचा पालकमंत्री आणि संयोजन समितीचा अध्यक्ष ह्या नात्याने माझे कर्तव्य असल्याचे मी मानतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या स्पर्धेसाठी क्रीडानगरी मधील बॅडमिंटन हॉल सुसज्ज करत असून जगभरातून येणाऱ्या स्पर्धकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असल्याचेही मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

आत्तापर्यंत ह्या स्पर्धेसाठी 32 देशांनी सहभाग नोंदविला असून त्यांची व्हिसा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असल्याचे राजू दाभाडे व संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

Share This News

Related Post

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची आकर्षक पुष्पसजावट

Posted by - June 3, 2022 0
फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या…

Breking News-शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Posted by - February 17, 2022 0
पुणे- लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ बबनराव कुचिक यांच्यावर पुण्यातील…

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे E-KYC मोहिमस्तरावर करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Posted by - July 27, 2022 0
पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश…

BIG NEWS : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला

Posted by - December 21, 2022 0
पुणे : फोन टॅपिंग प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *