Narendra Modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन

584 0

पुणे : देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची परडी व सुकामेवा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, सौरभ गाडगीळ यांनी ही मूर्ती साकारली होती.

मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी व मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांसह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा व महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.

Share This News

Related Post

Ankita And Suraj

पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा बायकोनेच रचला कट; अशाप्रकारे झाला खुलासा

Posted by - June 5, 2023 0
पिंपरी चिंचवड : काल पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. सूरज काळभोर…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष अभ्यासक्रम; हरी नरके, भुजबळांचा विरोध

Posted by - November 30, 2022 0
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री गणेश अथर्वशीर्ष यावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात…
zahir

Loni Kalbhor News : आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 8, 2023 0
लोणी काळभोर : लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहत असलेल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…
Mumbai News

Mumbai News : आझाद मैदान येथे आजपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे भव्य धरणे आंदोलन

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : परिचारिका संवर्ग हा अत्यंत सेवाभावी वृत्तीने सेवा देणारा, बहुतांश महिला कर्मचारी असलेला संवर्ग असून सन, उत्सव बाजूला ठेवून…

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा

Posted by - December 1, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *