Mountaineering Institute

Mountaineering Institute : राज्यात होणार स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट खा. अमोल कोल्हेंची ट्विटरद्वारे माहिती

674 0

पुणे : आता आपल्या महाराष्ट्रात पर्वतारोहणसारखे साहसी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट (Mountaineering Institute) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात सरकारकडे मागणी केली होती. सरकारकडून या इन्स्टिट्यूटसाठी (Mountaineering Institute) सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

काय लिहिले ट्विटमध्ये?
लवकरच स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट होणार, आपल्या मागणीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद!
तसेच नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरींग धर्तीवर महाराष्ट्रात गिर्यारोहक इन्स्टिट्यूटची निर्मिती व्हावी अशी मागणी आपण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांकडे केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले तमाम शिव-शंभू भक्तांसाठी शक्तीस्थळे आहेत. अनेकजण या गडकिल्ल्यांवर प्रेरणा घेण्यासाठी जात असतात. त्यासह अनेकांना गिर्यारोहणाची आवड आहे, कदाचित ती या महाराष्ट्राच्या मातीच्या रक्तातच असावी. या अनुषंगाने सर्व गिर्यारोहकांच्या दृष्टीने हे इन्स्टिट्यूट होणे आवश्यक असल्याने यासंदर्भात मी मागणी केली होती. मला सांगायला आनंद होतोय की आपल्या या मागणीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांतर्फे मी त्यांचे जाहीर आभार मानतो! असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

अमोल कोल्हेंनी पत्राद्वारे केली होती मागणी
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रावादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या इन्स्टिट्यूटच्या मागणीसाठी पत्र लिहिले होते. “भारतात आज गिर्यारोहण प्रशिक्षण देणाऱ्या चार संस्था कार्यरत आहेत. नेहरू इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरिंग (उत्तरकाशी), दार्जिलिंग येथील पर्वतारोहण संस्था, मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी माऊंटेनियरिंग अ‍ॅण्ड अलाईड स्पोर्ट्स संस्था आणि पगलगाम येथील जवाहर इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरिंग या संस्थांचा समावेश आहे. या चारही संस्थांमधून बेसिक पर्वतारोहण कोर्स, अ‍ॅडवान्स पर्वतारोहण कोर्स आणि शोध आणि बचाव, मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन असा अभ्यासक्रम शिकवला जातो. पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर राज्यात गिर्यारोहण इन्स्टिट्यूट (Mountaineering Institute) निर्माण करण्याबाबत प्राधान्याने विचार करावा”, अशी मागणी अमोल कोल्हेंनी या पत्राच्या माध्यमातून सरकारकडे केली होती.

Share This News

Related Post

Harshvardhan Patil

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - February 16, 2024 0
पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)…

तुम्हीही नेहमी ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचाच; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा !

Posted by - January 6, 2023 0
ट्रेनने प्रवास करताना आत्तापर्यंत तुम्हाला वेगवेगळा अनुभव आला. यामध्ये तिकीट रद्द केल्यावर पैसे कापले जाणे किंवा तासंतास उशिराने येणाऱ्या गाड्या…

कांडका पडला! राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाची दमदार एन्ट्री

Posted by - April 25, 2023 0
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज…
Punit Balan

Punit Balan : लष्कराच्या मध्य कमांडकडून पुनीत बालन यांचा गौरव

Posted by - January 17, 2024 0
पुणे : भारतीय लष्करासमवेत विविध उपक्रमात सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन (Punit Balan) ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन…

रशियावरील बंदीचा भारतावर परिणाम… ?

Posted by - March 7, 2022 0
युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगभरातून रशियावर टीका होत आहे.अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. निर्बंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *