जनकल्याण रक्तपेढीच्या सेवानिधी (फंडरेझर) उपक्रमाचे उद्घाटन

301 0

पुणे : जनकल्याण रक्तपेढीच्या सेवानिधी (फंडरेझर) या उपक्रमाचे उद्घाटन मा. श्री. सुधीरजी मेहता, ज्येष्ठ उद्योजक,यांचे हस्ते झाले. आधुनिक पद्धतीच्या सेवानिधी उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. जास्तीत जास्त जणांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. जनकल्याण रक्तपेढीच्या COVID मधील कार्याचाही त्यांनी गौरव पूर्ण उल्लेख केला.

श्री. रविंद्रजी वंजारवाडकर, मा. पुणे महानगर संघचालक यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपले गुणवत्ता पूर्ण काम समाजा समोर वेगळ्या माध्यमातून नेता येईल आणि समाज याला निश्चित प्रतिसाद आणि सहकार्य देईल असा विश्वास व्यक्त केला. रक्तपेढीच्या कामाची ओळख करून देताना कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी रक्त पेढी कॅन्सर, थॅलेसेमिया,गरीब गरजू रुग्ण यांचेसाठी वर्षाला ७०-८० लाखाची सवलत देत आहे आणि हा आकडा एक कोटी पर्यंत वाढणार आहे असे नमूद केले.

प्रसिद्ध अभिनेत्री सौ. मृणाल कुलकर्णी यांनी, जनकल्याण कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी देत असलेल्या सवलतीचा उल्लेख करत याप्रकारे रुग्णसेवा अविरत चालू रहाण्यासाठी सर्वांनी पुढे या असे व्हिडिओ द्वारे आवाहन केले. त्यांनी स्वत:चा फंड रेझर पण सुरू केला आहे. या सुविधेमुळे आता या कामामध्ये आस्था असलेले अनेक जण स्वत:च फंड रेझर उपक्रम करू शकतात. त्याची माहिती वेबसाईटवरच सोप्या रीतीने मिळेल असे मेडिया विद्याचे संचालक श्री अजिंक्य कुलकर्णी म्हणाले.

डॉ. प्रदीप कुरुलकर – ज्येष्ठ शास्त्रज्ञ, श्री. अजय पूरकर- अभिनेता, श्री. आरोह वेलणकर- अभिनेता, श्री अभिजित कुंटे- बुद्धिबळ पटू हे मान्यवर देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अमोल राजहंस यांनी केले. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी आभार व्यक्त केले. जनकल्याण रक्तपेढीच्या सेवानिधी (फंडरेझर) या उपक्रमाचे उद्घाटन

सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या मंगल दिवशी जनकल्याण रक्तपेढीच्या सेवानिधी (फंडरेझर) या उपक्रमाचे उद्घाटन मा. श्री. सुधीरजी मेहता, ज्येष्ठ उद्योजक,यांचे हस्ते झाले. आधुनिक पद्धतीच्या सेवानिधी उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. जास्तीत जास्त जणांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. जनकल्याण रक्तपेढीच्या COVID मधील कार्याचाही त्यांनी गौरव पूर्ण उल्लेख केला.

श्री. रविंद्रजी वंजारवाडकर, मा. पुणे महानगर संघचालक यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपले गुणवत्ता पूर्ण काम समाजा समोर वेगळ्या माध्यमातून नेता येईल आणि समाज याला निश्चित प्रतिसाद आणि सहकार्य देईल असा विश्वास व्यक्त केला. रक्तपेढीच्या कामाची ओळख करून देताना कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी रक्त पेढी कॅन्सर, थॅलेसेमिया,गरीब गरजू रुग्ण यांचेसाठी वर्षाला ७०-८० लाखाची सवलत देत आहे आणि हा आकडा एक कोटी पर्यंत वाढणार आहे असे नमूद केले.

प्रसिद्ध अभिनेत्री सौ. मृणाल कुलकर्णी यांनी, जनकल्याण कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी देत असलेल्या सवलतीचा उल्लेख करत याप्रकारे रुग्णसेवा अविरत चालू रहाण्यासाठी सर्वांनी पुढे या असे व्हिडिओ द्वारे आवाहन केले. त्यांनी स्वत:चा फंड रेझर पण सुरू केला आहे. या सुविधेमुळे आता या कामामध्ये आस्था असलेले अनेक जण स्वत:च फंड रेझर उपक्रम करू शकतात. त्याची माहिती वेबसाईटवरच सोप्या रीतीने मिळेल असे मेडिया विद्याचे संचालक श्री अजिंक्य कुलकर्णी म्हणाले.

डॉ. प्रदीप कुरुलकर – ज्येष्ठ शास्त्रज्ञ, श्री. अजय पूरकर- अभिनेता, श्री.आरोह वेलणकर-अभिनेता, श्री अभिजित कुंटे- बुद्धिबळ पटू हे मान्यवर देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अमोल राजहंस यांनी केले. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी आभार व्यक्त केले.

Share This News

Related Post

sharad pawar saheb

अखेर…शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Posted by - May 5, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींना प्रचंड वेग आलेला होता. या घडामोडींकडे…

#FIRE CALL : पिरंगुटमधील सुजनील केमिको कंपनीमध्ये आगीची घटना

Posted by - February 20, 2023 0
पुणे : पिरंगुटमधील सुजल केमिको कंपनीला आज दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. दरम्यान पीएमआरडीए अग्निशमन केंद्र मारुंजी आणि…

40 व्या वर्षी MPSC उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिकाचे खा. सुळे यांच्याकडून कौतुक; लष्करात सतरा वर्षे सेवा करून आता जनतेची सेवा करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचा गौरव

Posted by - January 17, 2023 0
दौंड : भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. पास…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Posted by - December 25, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime News) मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील कात्रज येथून नुकतीच एक धक्कादायक घटना…
chitra wagh

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा; चित्रा वाघ यांची मागणी

Posted by - May 7, 2023 0
पुणे : ‘द काश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *