अमृत महोत्सवानिमीत्त हडपसर येथे ‘नगर वन उद्यान’ उभारणीचा शुभारंभ

175 0

पुणे:‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्ताने केंद्र शासन पुरस्कृत योजनेतून पुणे वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत महंमदवाडी तसेच हडपसर येथे ‘नगर वन उद्यान’उभारणीचा शुभारंभ पुणे वनवृत्ताचे मुख्य वनंसरक्षक एन. आर. प्रविण यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्ताने केंद्र शासन पुरस्कृत ‘नगर वन उद्यान’ उभारण्याची योजना आहे. या अनुषंगाने पुणे वन विभागाच्या अखत्यारित असलेले पुणे वन परिक्षेत्र पुणे अंतर्गत महंमदवाडी व हडपसर येथे वन उद्यान उभारणी करण्यात येत आहे. या उद्यानात ‘हरियाली महोत्सव’ अंतर्गत सुमारे ८५० वृक्षांची लागवड आज करण्यात आली.

बिशप स्कूल उंड्री आणि सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर येथील विद्यार्थी तसेच आनंदवन फाऊंडेशन, ग्रीन नंदनवन या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी या वृक्षारोपणात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना वृक्ष संवर्धनासंदर्भात तसेच पुणे वन विभाग राबवत असलेले ‘क्लिन हिल्स, ग्रीन हिल्स’, वनमहोत्सव, हरियाली महोत्सव आदी उपक्रमांविषयी माहिती देवून सहभागाविषयी आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला कालिंदाताई पुंडे, पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस तसेच वनपाल विशाल यादव, मंगेश सपकाळे, सिमा मगर, मनोज पारखे यांच्यासह पुणे वनपरिक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Pune Metro Timetable Changed

पुणे मेट्रोची विद्यार्थ्यांसाठी खास योजना; 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना मिळणार एक पुणे विद्यार्थी पास

Posted by - October 6, 2023 0
पुणे शहरात नुकतीच मेट्रो सेवा सुरू झाले असून आता या महा मेट्रो कडून विद्यार्थ्यांसाठी एक पुणे विद्यार्थी पास या मेट्रो…

कर्मचाऱ्यांना आता शनिवारी आणि रविवारी देखील करावे लागणार काम ! संपामुळे कामाचा लोड वाढला

Posted by - March 25, 2023 0
पुणे : कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्च 23 मार्च या कालावधीत संप पुकारला होता. त्यामुळे आर्थिक…

पुण्यातील तरुणाची अनोखी शिवभक्ती ! तब्बल 22 हजार 301 नाण्यांपासून बनवले शिवलिंग, गिनीज बुक मध्ये नोंद

Posted by - February 18, 2023 0
पुणे : पुण्यातील एका शिवभक्त तरुणांन अनोखी शक्कल लढवली आहे. आजपर्यंत अनेक वस्तूंपासून बनवलेले शिवलिंग तुम्ही पाहिले असेल, ऐकले असेल.…

रिक्षा चालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आवाहन

Posted by - December 8, 2022 0
पुणे : राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात…
PMPL

पुणे पीएमपीच्या ताफ्यात नव्या 900 इलेक्ट्रिक बस येणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

Posted by - June 15, 2023 0
पुणे : येत्या काळात पीएमपीच्या (PMP) ताफ्यात 900 इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. यामध्ये 600 बस केंद्र शासनाकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *