श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठेतील  श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार

464 0

पुणे, प्रतिनिधी – श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठ येथील तब्बल १३८ वर्षे पुरातन श्री. विठ्ठल–रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचे ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. जान्हवी धारीवाल – बालन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून देशभर विविध प्रकारची शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कामे केली जातात. पुण्यातील नवी पेठत असलेले श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर हे पुरातन असून या ठिकाणी श्री. हनुमान, श्री. ज्ञानेश्वर माऊली, श्री. तुकाराम महाराज यांच्या मूर्तीही आहेत. या मंदिरात संपूर्ण शहरातून भाविक भक्तीभावाने दर्शनासाठी नियमित येत असतात. दरमहा एकादशीनिमित्त तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी असते. ‘श्रीमती इंद्राणी बालन’ यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या माध्यमातून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आणि नुकतेच पुनीत बालन आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. जान्हवी बालन-धारीवाल यांच्या शुभहस्ते सपत्नीक पूजा-आरती करुन या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे विश्वस्त, परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक, भाविक, माजी महापौर अंकुश काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक यावेळी उपस्थित होते.

‘‘आपल्या भक्तासाठी युगेनयुगे विटेवर उभा असलेला विठुराया आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. याच श्री विठुरायाचं आणि रुख्मिणीच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण करण्याची संधी माझ्यासारख्या त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या भक्ताला मिळणं, हे माझं भाग्य समजतो. माझ्या हातून यापुढंही अशीच सेवा घडावी, अशी मी श्री विठुरायाचरणी प्रार्थना करतो’’ असं मत युवा उद्योजक पुनीत बालन यांनी व्यक्त केलं

Share This News

Related Post

Breaking news ! 15 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाच्या सूचना

Posted by - April 6, 2022 0
मुंबई- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील 5 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने…

पुणेकरांनो घरात मांजर पाळताय ? महापालिकेचा घ्यावा लागेल परवाना

Posted by - November 11, 2022 0
पुणे : पुणेकर मांजरप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे.पुणेकरांना आता कुत्र्यापाठोपाठ घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या…
accident

Pune News : डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 2, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा डंपरखाली सापडून मृत्यू…

डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत ‘गॅझेट फ्री दहीहंडी’ … !

Posted by - August 19, 2022 0
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत ‘गॅझेट फ्री दहीहंडी’चे (खेळांची दहीहंडी) आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, व्हॉलिबॉल,…
Pune News

Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - January 24, 2024 0
पुणे : पुण्यातील FTII मधील (Pune News) वादग्रस्त बॅनर प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणासंदर्भात संस्थेतील 7 विद्यार्थ्यांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *