धक्कादायक:”कुणाकडे तक्रार करायची तर कर,मी कुणाला घाबरत नाही”,अशी धमकी देऊन पिटी शिक्षकानेच केला अल्पवयीन मुलींचा विनयभंग

306 0

पुणे : “कुणाकडे तक्रार करायची तर करा,मी कुणाला घाबरत नाही….”अशी धमकी देऊन शाळेतील पिटी शिक्षकानेच अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,पुणे महापालिकेच्या शाळेत पिटीचे क्लास घेणाऱ्या एका कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिक्षकाने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून,मोहम्मद कयूम अंसारी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा फुले पेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेतील पिटीचे क्लास घेणाऱ्या अन्सारी याने अल्पवयीन मुलींना पिटी शिकवताना त्यांना अयोग्य ठिकाणी हात लावणे,वाईट हेतूने स्पर्श करणे तसेच अश्लील भाषेचा वापर करून विनयभंग केला आहे.तसेच “कुणाकडे तक्रार करायची तर करा,मी कुणाला घाबरत नाही”अशी धमकी देखील या पिटी शिक्षकाने दिल्याचे घडकीस आले आहे.
खडक पोलीस पथकाने आरोपी मोहम्मद कयूम अन्सारी याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे

Share This News

Related Post

Ahmadnagar News

Ahmadnagar News : अहमदनगर हादरलं ! 400-500 जणांच्या जमावाचा दोन कुटुंबांवर हल्ला

Posted by - December 7, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar News) जिल्ह्यातील निर्मळपिंप्री गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला आहे. पोलीस आणि…

वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना 25 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Posted by - October 21, 2022 0
पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी…

बारामतीचा नाद नाय करायचा ! तमाशाचा नारळ वाढवण्यासाठी ‘सव्वा लाखाची गोष्ट’

Posted by - April 13, 2023 0
ग्रामीण भागामध्ये तमाशाला अनन्यसाधारण महत्व आहे. तमाशा म्हटले की प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारतो. गावच्या जत्रेत तमाशाचा फड रंगला नाही तरच…

वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित 500 खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीला विलंब झाल्याने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता धोक्यात : आम आदमी पार्टीचा इशारा

Posted by - December 2, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विषयक धोरण आणि विविध प्रकल्प हे खाजगीकरण, आर्थिक हितसंबंध, इच्छाशक्तीचा अभाव यामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या मुळावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *