‘मी कोणाला घाबरत नाही..’ म्हणत पूजा खेडकरच्या आईची पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकी

128 0

‘मी कोणाला घाबरत नाही..’ म्हणत पूजा खेडकरच्या आईची पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकी

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. काल त्यांच्या आईने माध्यमांच्या प्रतिनिधींशी आरेरावे केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पूजा यांची आई हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे दिसून येत आहे.

 

हा व्हिडिओ मुळशी मधील असल्याची माहिती मिळाली असून खेडकर कुटुंबाने या ठिकाणी 25 एकर जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी केल्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याने त्यांना रोखल्यानंतरही शेतकऱ्याचे काहीच ऐकून घेतले नाही. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या थेट बाउन्सर घेऊन या ठिकाणी पोहोचल्या. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी चक्क पिस्तूल दाखवत या सर्व शेतकऱ्यांना धमकावले. त्याचबरोबर ‘हे करू नका असं मला कुठलाही कायदा सांगत नाही’, मी कुणालाही घाबरत नाही’, अशा शब्दात व्हिडिओ काढत असलेल्या लोकांनाही धमकावल्याचे दिसून येत आहे. तर याहून गंभीर गोष्ट म्हणजे संदर्भात संबंधित शेतकरी हे पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार देखील नोंदवून घेतली नाही. त्यामुळे हे खेडकर कुटुंबीय कोणाच्या हिंमतीवर हे सगळं करत होते ? त्यांच्यावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Share This News

Related Post

सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मुलांच्या वसतिगृहात आगीची घटना; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Posted by - July 7, 2024 0
पुणे – आज दिनांक ०७\०७\२०२४ रोजी सकाळी ०६•४४ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आग लागली असल्याची वर्दि…

परवाना नसताना रॅपिडो कंपनीने सुरू केली बाईक आणि टॅक्सीसेवा; बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - November 25, 2022 0
पुणे : पुण्यातील रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सुयश प्लाझा, भांडारकर रोड या कंपनीने महाराष्ट्र राज्याच्या अथवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा…
Pune News

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने पटकावले विजेतेपद

Posted by - March 2, 2024 0
पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या…
Pune News

Pune News : पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचा आश्रय का? मुकुंद किर्दत यांचा संतप्त सवाल

Posted by - January 16, 2024 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune News) कुख्यात शरद मोहोळ यांचा खून झाल्यानंतर आता आरोपी म्हणून विठ्ठल शेलार याचे नाव पूढे आले…

वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 1, 2022 0
सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल सह  गॅस दरांच्या किमतीच्या विरोधात पुण्यात महागाई ची गुढी उभारत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. राज्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *