सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

450 0

पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.

रासने बॅंकेचे ज्येष्ठ संचालक असून, सन २००९ ते २०११ या कालावधी त्यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कारकिर्दीत बॅंकेने ‘नॉन परफॉर्मिंग ॲसेटस’चे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले होते. रासने महापालिकेच्या स्थायी समितीचे सलग चार वेळा अध्यक्ष होते. महापालिकेला कोरोना काळातही विक्रमी महसूल उत्पन्न जमा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख म्हणूनही रासने कार्यरत आहेत.

अध्यक्षपदी निवड झाल्यावर रासने म्हणाले, “सुवर्णयुग बॅंकेची स्थापना २ ऑक्टोबर १९७३ रोजी झाली. सध्या बॅंकेच्या २२ शाखा आणि मुख्यालय आहे. बॅंकेचा व्यवसाय १३३५ कोटी रुपये असून, ८०९ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ५२६ कोटी रुपयांची कर्जे आहेत. येत्या आर्थिक वर्षात बॅंक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. नजिकच्या काळात बॅंकेचा शाखा विस्तार ५० पर्यंत आणि व्यवसाय पाच हजार कोटी रुपये करण्याचा निर्धार आहे. तसेच एनपीए शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बॅंकेच्या मुख्यालयाची स्वतंत्र आणि भव्य वास्तू साकारणार आहोत”

नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीन राऊत यांना बॅंकिंग कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शाहुराज हिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Share This News

Related Post

Akhil Mishra Passed Away

Akhil Mishra Passed Away : बॉलिवूड अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन; लायब्रेरियनची ‘ती’ भूमिका केली होती अजरामर

Posted by - September 21, 2023 0
बॉलिवूडमधून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. थ्री इडियट्ससह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन (Akhil…

#Accident : अपघात ग्रस्त दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरून पळ काढणारा ट्रकचालक गजाआड

Posted by - February 6, 2023 0
पिंपरी : अज्ञात ट्रकचालकाने जबर धडक देऊन पृथ्वीराज शेळके (वय वर्षे 22) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर ट्रक…

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Posted by - March 29, 2022 0
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते…

शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’ बँकेत विलीन करण्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाची मंजुरी

Posted by - October 30, 2022 0
पुणे: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण, एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी (दि.29)…

शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्या, महापौर मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Posted by - February 12, 2022 0
पुणे- कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *