Top News Marathi Logo

खुशखबर ! येत्या 22 मार्चपासून पुन्हा सुरू होणार रेल्वेचा मासिक पास

448 0

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पुणे-मुंबई  रेल्वे मासिक पासची सेवा बंद आहे. मात्र सद्यस्थितीला कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे.

दुसरीकडे , बाधित रुग्णांची संख्याही शून्यावर आली आहे. त्यामुळे येत्या 22 मार्चपासून रेल्वे मासिक पास  व जनरल तिकिटाची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वेने पुणे – मुंबई असा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मासिक पासची सुविधा पूर्ववत व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटनेतर्फे वारंवार पाठपुरावा केला होता.

नोकरी , व्यवसायाच्या निमित्तानं नियमितपणे पुणे- मुंबई असा प्रवास करणारे अनेक प्रवाशी आहेत. मधल्या काळात कोरोनाच्या महामारीमुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्यात आली, पण पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करण्यासाठी मासिक पास आणि जनरल तिकिटाची सुविधा अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवासी संघटनेकडून ही सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. पुणे-मुंबई रेल्वे मासिक पासची आणि जनरल तिकिटाची सेवा 22 मार्चपासून पूर्ववत होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी स्वतःहून करोना नियमांचे पालन करावे. जेणेकरून कमी झालेला करोना पुन्हा वाढू नये, यासाठी खबरदारी घ्यावी , असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष इक्‍बाल मुलाणी यांनी केलं आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Weather

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, हवामान विभागानं दिलेल्या…
Nitin Gadkari And Truck

Nitin Gadkari : ट्रकचालकांसाठी नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - June 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील ट्रक चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन…
Thane News

Thane News : गुन्हा करण्यासाठी शहरात आला; मात्र ‘ती’ चूक पडली महागात आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Posted by - October 22, 2023 0
ठाणे : पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस बाळगून उल्हासनगर येथील (Thane News) शांतीनगर भागातील जगदंबा मंदिर येथे गंभीर गुन्हा करण्यासाठी…

पाषाण-सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा ; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

Posted by - September 7, 2022 0
पुणे : सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण…

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *