Mumbai Airport Shut

पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल होणार सुरू, वाचा सविस्तर

643 0

पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची एक बातमी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर साकारलेले नवे टर्मिनल लवकरच वापरासाठी खुले होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

https://x.com/mohol_murlidhar/status/1806947687553466589?s=19

पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांसाठी विमानतळावर नवे टर्मिनल साकारले होते. काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते. मात्र सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. या वापराच्या प्रतीक्षेत पुणेकर अनेक दिवसांपासून होते. त्यातच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपद दिल्यामुळे मोहोळ यांनी पाठपुरावा केला. आणि आता अखेर या टर्मिनल चा मार्ग खुला झाला आहे. सीआयएसएफच्या मनुष्यबळाची केंद्रीय गृहविभागाकडून पूर्तता करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती.

मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘नवे टर्मिनल लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी केलेल्य प्रयत्नांना यश आले असून पुणे विमानतळासाठी २२२ विविध पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे वेगवेगळ्या ७ प्रकारांची आहेत. या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सीआयएसएफच्या मनुष्यबळाची संख्या ७१५ वर गेली आहे. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे हे टर्मिनल लवकरात लवकर खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनुष्यबळ पुरवण्याची मागणी गृहविभागकडून मान्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद मानतो’.

नव्या टर्मिनल बरोबरच विमानतळावरील धावपट्टी वाढवण्यासाठी शक्यता तपासणी सर्वेक्षणला (OLS) परवानगी मिळाली तसेच पार्किंग बेवर पार्क केलेले विमान संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले. या दोन्ही मुद्द्यांवर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. आणि आता हे तिन्ही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत.

Share This News

Related Post

sushma andhare and neelam gorhe

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Posted by - December 23, 2023 0
पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचे निर्देश दिले.…

मशिदींवर काढून भोंगे करू नका तुम्ही सोंगे ; रामदास आठवले यांचा कवितेतून राज ठाकरेंना टोला 

Posted by - April 23, 2022 0
आधी गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, नाहीतर मनसे दुप्पट आवाजात हनुमान…

मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखतील, संभाजीराजे छत्रपती यांचे सूचक वक्तव्य

Posted by - May 24, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर…
Maratha Reservation

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Posted by - March 3, 2024 0
सोलापूर : सोलापुरमध्ये मराठा समाज (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सोलापुरातल्या एका गावात मराठा समाजाने भाजपा आणि मित्र…
Wardha Crime

Wardha Crime : गावात दहशत पसरवणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनी ‘या’ पद्धतीने शिकवला धडा

Posted by - August 11, 2023 0
वर्धा : वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Wardha Crime) कारागृहातून जामिनावर आल्यानंतर गावात दहशत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *