Khadakwasla Dam

पुणेकरांसाठी खुशखबर! एका दिवसाच्या पावसात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा; वाचा कोणत्या धरणात किती पाणी ?

613 0

जून महिन्यात पुण्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे जुलै महिन्यात पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यात सातत्याने झालेल्या पावसामुळे पुणेकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार असल्याची शक्यता आहे. त्यातच आनंदाची बाब म्हणजे पुण्यात केवळ 24 तासात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या महिन्याभराच्या पाण्याची चिंता मिटवली आहे.

शनिवार आणि रविवारी पुण्यातील धरण क्षेत्रात धो धो पाऊस झाला. ज्यामुळे खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागच्या महिन्यात पुणेकरांना केवळ एक महिना पुरे इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातही पुण्यात वारीचे प्रस्थान झाल्यानंतर दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वापरला गेला. ज्यामुळे पुणेकरांचा पाणी प्रश्न आणखी बिकट होण्याची चिन्ह दिसत होती. मात्र आता अखेर पुढच्या एक ते सव्वा महिन्यासाठी पुणेकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकवासला धरणात सध्या 53.12 टक्के, वरसगाव धरणात 25.81 टक्के, पानशेत धरणात 39.78 टक्के तर टेमघर मध्ये 22.77 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे पुणेकरांच्या एक महिन्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

Share This News

Related Post

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Posted by - March 18, 2022 0
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे.…

पुणे : नामकरण विवादानंतर ‘त्या’ उद्यानाचे नाव आता “धर्मवीर आनंद दिघे उद्यान”- उदय सामंत (VIDEO)

Posted by - August 2, 2022 0
पुणे : हडपसर येथील उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव पहिले दिले जाणार होते. मात्र, करण्यात येणारे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार…

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गणेशभक्तांची मोठी गर्दी

Posted by - January 1, 2023 0
पुणे – नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी सकाळपासूनच…

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’चे प्रकाशन

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्रवचनकार डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या…

CRIME NEWS : भर दहीहंडीच्या उत्सवामध्ये सिंहगड रोडवर टोळीयुद्ध ; फायरिंग … पूर्ववैमानस्यातून कोयत्याने वार !

Posted by - August 20, 2022 0
पुणे : पुणे शहरामध्ये शुक्रवारी दहीहंडीचा उत्सव एकीकडे जोरदार साजरा केला जात असतानाच , एक धक्कादायक घटना घडली आहे .…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *