Chandrakant Patil

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यापासून संपुर्ण वेतन आयोग लागू; चंद्रकांत पाटलांची माहिती

381 0

पुणे : मागील काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया (Om Prakash Bakoria) यांनी 50 टक्के सातवा वेतन आयोग पीएमपी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. त्यानंतर पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली होती.

ही मागणी आता पूर्ण झाली असून पुढच्या जुलै 2023 या महिन्यापासून संपूर्ण कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पीएमपी कर्मचाऱ्यांचे आणि अन्य विषयांसंदर्भात चर्चा झाली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते.

Share This News

Related Post

CRIME NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ; आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल

Posted by - November 14, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्वर…
Mumbai News

Mumbai News: मुंबईतील महिलेने श्वानासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य; CCTV फुटेज पाहून बसेल धक्का

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : श्वानाची गणना जगातील सर्वात प्रामाणिक प्राण्यांमध्ये केली जाते. त्याने एकदा आपल्या मालकाला जीव लावला कि तो मरेपर्यंत त्याची…
ajit pawar and supriya sule

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - May 1, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित…

बारामती : इंडियन एयर फोर्सच्या चेतक हेलिकॉप्टरचे करावे लागले अचानक लँडिंग

Posted by - December 1, 2022 0
बारामती : संशयास्पद तांत्रिक अडचणीमुळे आज बारामती एअरफिल्डपासून कमी असलेल्या मोकळ्या भागात आयएएफच्या चेतक हेलिकॉप्टरने सावधगिरीने लँडिंग केले. क्रू आणि…

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट, वाचा सविस्तर माहिती

Posted by - October 4, 2022 0
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *