Pune News

Pune News : बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल मित्राला दाखवत असताना मित्राकडून अचानक सुटली गोळी अन्…

2800 0

पुणे : पुण्यातून (Pune News)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावामध्ये हि घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
अभय छगन वाईकर (22) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (19, रा. सांगरुण, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वाईकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभय वाईकर आणि आविष्कार धनवडे मित्र आहेत. दोघे खडकवासला परिसरातील सांगरुण गावात राहायला आहेत.

वाईकरने देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. तो धनवडे याला ते पिस्तूल दाखवित असताना धनवडे याच्याकडून पिस्तूलाचा चाप ओढला गेला. पिस्तुलातून सुटलेली गोळी वाईकरच्या मानेला चाटून गेली. या घटनेत वाईकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

mumbra

सेलोटेपमध्ये गुंडाळलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश

Posted by - June 14, 2023 0
ठाणे : 27 मे रोजी ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात खाडी किनारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह चादरीमध्ये बांधून सेलो टेपच्या…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडाचे याअगोदर ‘6’ वेळा केले होते प्रयत्न

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) हे नाव प्रचंड चर्चेत आहे. अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारला…
Accident News

Accident News: बहिणीकडून परतत असताना काळाचा घाला; रक्षाबंधन अगोदर भावाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
वाशीम : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Accident News) अनेक घटना समोर येत…
Satara Dead

मध्यरात्री पुण्याहून रिटर्न येताना टिप्परने दिलेल्या धडकेत दोघा मित्रांचा दुर्दैवी मुत्यू

Posted by - May 17, 2023 0
सातारा : आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला. आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय…
Odisha Malgadi

ओडिशामध्ये पुन्हा रेल्वे अपघात; मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले (Video)

Posted by - June 5, 2023 0
ओडिशा : ओडिशातील बालासोर दुर्घटनेला तीन दिवस उलटत नाही तोपर्यंत सोमवारी पुन्हा एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. बारगढ जिल्ह्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *