Prof. Ram Takawale

Prof. Ram Takawale : ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्रो.राम ताकवले यांचे निधन

463 0

पुणे : ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले (Prof. Ram Takawale) यांचे आज निधन झाले आहे. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले होते. तसेच महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल)(MKCL) झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.

तसेच त्यांनी शिक्षकांसाठी बॅचलर ऑफ एज्युकेशन, मुक्त शिक्षण स्त्रोत निर्मिती आदी विविध प्रकारच्या साहित्यांचे लेखनसुद्धा केले होते. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग हा पुरस्कार (Common Wealth of Learning Award) जाहीर करण्यात आला होता. याचबरोबर त्यांना राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी मुक्त विद्यापीठानंतर 1996 ते 1998 या काळात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पदाची जबाबदारी देखील सांभाळली होती. त्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन समाजाभिमुख शिक्षणक्रमासाठी महत्वपूर्ण कार्य केले होते.

Share This News

Related Post

मोठी बातमी! उद्योगपती अविनाश भोसले यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी

Posted by - May 31, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएल…

Attack on MLA Uday Samant : शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह अन्य 5 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
पुणे : माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर मंगळवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह अन्य 5 जणांना दोन…
Pune News

Pune News : बोगस शिवसैनिकास खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने दिले ‘हे’ उत्तर

Posted by - April 1, 2024 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतली. गेल्या अनेक…
Chandrakant Patil

Chandrakant Patil : पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 2, 2023 0
पुणे : सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही…
ED

DHFL Scam : वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Posted by - October 27, 2023 0
मुंबई : DHFL घोटाळा प्रकरणी (DHFL Scam) वाधवान बंधुंवर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *