सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मुलांच्या वसतिगृहात आगीची घटना; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

155 0

पुणे – आज दिनांक ०७\०७\२०२४ रोजी सकाळी ०६•४४ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आग लागली असल्याची वर्दि नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून जनता अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांच्या निदर्शनास आले की, सदर ठिकाणी असणारया मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठयासाठी वापरात असलेला सीटी मीटरने पेट घेतला होता व यादरम्यान मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. परंतु, त्याचवेळी तेथील कर्मचारीवर्ग यांनी तातडीने अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन आग विझवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन दल व महावितरण विभागास संपर्क केला होता. जवानांनी घटनास्थळी पाहणी करुन आग पुर्ण विझवत धोका दुर केला. त्याचवेळी महावितरणकडून पर्वती विद्युत विभागाचे कर्मचारी वेळेत दाखल होत त्यांनीदेखील पाहणी करुन पुढील कार्यवाही केली. या घटनेत सुदैवाने जखमी कोणी नाही.

या कामगिरीत जनता वसाहत अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक सागर देवकुळे व फायरमन महेंद्र सकपाळ, उमेश शिंदे, सागर पाटील, विजय वाघमारे यांनी सहभाग घेतला.

अग्निशमन दल शहर परिसरात विविध आस्थापना तसेच रहिवासी इमारती, शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मॉल वा इतर ठिकाणी घेत असलेले अग्निविषयक सुरक्षा व उपाययोजना यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिके यामुळे आज महाविद्यालयातील कर्मचार्यांनी प्राथमिक स्वरुपात अग्निरोधक उपकरण वापरत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! पुण्यातील वर्दळीच्या कुमठेकर रोडवर पीएमपीएमएल बसची 7 ते 8 गाड्यांना धडक

Posted by - May 11, 2022 0
पुणे- पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर पीएमपीएलच्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे सात ते आठ गाड्यांना धडक दिली. या अपघातात २ ते ३…
Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - March 19, 2024 0
पुणे : पुण्यातील वाकड परिसरातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आर्थिक विवंचनेतून‎ एका व्यक्तीने पोटच्या…

कर्मचाऱ्यांना आता शनिवारी आणि रविवारी देखील करावे लागणार काम ! संपामुळे कामाचा लोड वाढला

Posted by - March 25, 2023 0
पुणे : कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्च 23 मार्च या कालावधीत संप पुकारला होता. त्यामुळे आर्थिक…

मोठी बातमी : रोझरी स्कूलचे संचालक विनय आ-हाना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीचा छापा; वाचा सविस्तर प्रकरण…

Posted by - January 30, 2023 0
पुणे : पुण्यातील रोझरी स्कूलचे संचालक विनय आराना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीन धाड टाकली आहे. पिंपरी चिंचवड मधील सेवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *