Pune News

Pune News : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने पुणे विद्यापीठाच्या आवारात जोरदार राडा

425 0

पुणे : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) आवारातील सेवक वसाहतीमध्ये घडली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दिनेश वाल्मिकी (वय 30), प्रतिक मल्हारी (वय 23, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय 25, रा. चिखलवाडी, ओैंध) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या राड्याप्रकरणी कृष्णा किशोर तांबोळी (वय 35, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय घडले नेमके?
तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील चाळीत राहतात. गणेश उत्सव 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी विद्यापीठात सेवक चाळीत तयारी सुरू आहे. या साठी वर्गणी गोळा करण्याचे देखील काम सुरू आहे. दरम्यान, वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. मात्र, तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.

याचा राग आल्याने आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर हा वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. यात तांबोळी हे जखमी झाले. पोलीस नाईक रायकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणामध्ये आरोपींविरोधात गुन्हे शाखेनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Posted by - January 28, 2024 0
पुणे : कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत या…

फिल्मी स्टाईल पळापळी : रस्त्यावर झाली वाहतूक कोंडी; नवरदेवाने काढला पळ

Posted by - March 10, 2023 0
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे, की ज्या घटनेवर हसावं की दुःख व्यक्त करावं असाच प्रश्न पडेल. तर…

पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

Posted by - March 15, 2022 0
ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा 10 लाखावरुन 15 लाख – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - November 2, 2022 0
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *