चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री

971 0

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे . दोन गटात होणारे आरोप प्रत्यारोप गेली ७ वर्षे होत असून अजूनही त्याच त्याच आरोप प्र्त्यारोपांवर हि निवडणूक लढविली जाते कि काय ? अशी शक्यता दिसत असताना कला प्रसिद्धी विभागातून पुण्यातील पत्रकार आणि सलाम पुणे या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

याच सोबत त्यांनी आपणला संक्षिप्त जाहीरनामाही आज माध्यमांना पाठविला आहे. यात दिलेल्या विशेष बाबी- मराठी सिनेसृष्टी आणि सिंगल स्क्रीन थियेटर सह एक्स्ट्रा आर्टिस्ट,तंत्रज्ञ यांना गतवैभव -सुवर्ण काळ लाभावा या साठी अनेक योजना-प्रकल्प राबविण्याची गरज आहे, त्या आपण सादर करून त्याचा पाठपुरावा करणार.ज्यामुळे थियेटर आणि मराठी सिनमापासून दूर चाललेला रसिक पुन्हा उत्सुकतेने गर्दी करू लागेल . आणि एकूणच या व्यवसायातील प्रत्येकाला प्रतिष्ठा ,वैभव लाभू शकेल.

या क्षेत्रात पैसा लावणाऱ्या निर्मात्यापासून ते गरीब तंत्रज्ञा पर्यंत अनेकांची आर्थिक पिळवणूक होते. कोणाला व्यसनाधीन करून तर कोणाला आमिषे दाखवून लुटले जाते .प्रसिद्धी आणि मार्केटिंगच्या नावाखाली होणाऱ्या अमाप फसवणुकीला पायबंद घालणे . मुंबई,कोल्हापूर ,पुणे या सारख्या ठिकाणी ज्यांची ऐपत नाही अशा सिनेसृष्टीतील गोरगरीब तंत्रज्ञ ,एक्स्ट्रा आर्टिस्ट यांच्या साठी शासकीय मदतीने स्वस्तात गृहप्रकल्पांची उभारणी करणे.

मुंबईतील फिल्म सिटी मध्ये महाराष्ट्रातून कामासाठी येणाऱ्या प्रत्येक फिल्मी कलावंत-कामगारासाठी किमान ४०० जण राहू शकतील असे अत्यल्प दरात वसतिगृह उभारणे . शरद लोणकर यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर अपक्ष म्हणून कला प्रसिद्धी विभागातून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता . कला प्रसिद्धी वगळता सर्व जागेवर एकाच पॅनेल च्या उमेदवारांचा विजय झाला होता .

Share This News

Related Post

Rain Update : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला

Posted by - July 14, 2022 0
पुणे : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. आजही खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातून मोठ्या…

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - August 28, 2023 0
पुणे : पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर,…

पुणे तिथे दंडही नाही उणे ! पुणेकरांनी बेशिस्त वाहन चालविण्यासाठी दिला १५ कोटी दंड

Posted by - April 7, 2023 0
पुणेकर दंड भरण्यामध्ये देखील स्वतःला मागे ठेवत नाहीत. वाहन चालवताना नियमाची पायमल्ली करत हजारो पुणेकरांनी दंडाच्या स्वरूपात प्रादेशिक परिवहन विभागाला…

हनुमान चालीसा पठण व महाआरतीला अनुउपस्थित राहणार ? पाहा… काय म्हणाले वसंत मोरे

Posted by - April 15, 2022 0
पुणे- गुढीपाडवा मेळावा व उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असून…
Punit Balan

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Posted by - April 12, 2024 0
पुणे : रोहा (जि. रायगड) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या 42 व्या कुमार – मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 2022-23…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *