Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंना धमकी ! 19 वर्षीय विद्यार्थ्यांला पुण्यातून अटक

548 0

मुंबई : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने पुणे परिसरातून अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे धमकी देणारा हा 19 वर्षीय तरुण आहे. आरोपीने सोशल मीडियावरून ही धमकी दिली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

कोण आहे आरोपी?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव शुभम वरकड आहे. तो मूळचा नांदेडचा असून तो पुण्यात शिकत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पदवीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असून धमकी देण्यामागील हेतू तपासण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय नावाच्या व्यक्तीने 11 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर एक पोस्ट लिहून म्हटले होते की, “मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो हवा आहे. मी गुंडगिरी सुरू करण्याचा विचार करत आहे. माझ्याकडे थोडासा अनुभव आहे आणि गुंड मला मार्गदर्शन करू शकतात. या पोस्टला शुभम वरकडने स्वत:च्या अकाऊंटवरून रिप्लाय देताना म्हटले आहे की, “बंदूक मी आणून देतो भाऊ तुला, पण पहिला गेम एकनाथ आणि श्रीकांत यांचाच कर.”

यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाच्या हत्येबाबत खुलेआम बोलणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ही पोस्ट पाहिल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करत आरोपीचा जीमेल आयडीशी जोडलेला आयपी अ‍ॅड्रेस आणि त्याचा मोबाइल नंबर आणि त्याचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यातून शुभम वरकडला अटक केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थकांवर एक महिला पडली भारी; पोलिसांसमोरच आंदोलकांशी भिडली

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

Paragliding : पद्मश्री शीतल महाजन यांच्यासोबत ‘या’ भाजप खासदाराने पॅराग्लायडिंग करून रचला इतिहास

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Related Post

Shankar Jagtap

Shankar Jagtap : पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

Posted by - July 19, 2023 0
पुणे : भाजपने आज पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी–चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप (Shankar Jagtap)…
Punit Balan NDA

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Posted by - January 16, 2024 0
पुणे : देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा (NDA) इतिहास ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन…
Supriya Sule

Supriya Sule : महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी खा. सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

Posted by - November 16, 2023 0
पुणे : महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव…
Supriya-Sule

#SUPRIYA SULE : मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या

Posted by - March 15, 2023 0
दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया…

गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगे मधील राधा चौकात राडा (व्हिडिओ)

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात पुन्हा एकदा व्यावसायिक वर्चस्ववादातून टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. जानेवारी महिन्यात घडलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *