पायरी पुराण..! (संपादकीय)

689 0

माझा पत्ता : पुणे महापालिका प्रवेशद्वार/वरून पाचवी पायरी

माझा अल्प परिचय : रोज-दररोज माझ्या अंगावरून शेकडो जण पालिकेत ये-जा करत असतात. सर्वसामान्यांपासून ते अगदी कितीतरी थोरा-मोठ्यांचे पाय मला लागले असतील… पण काही दिवसांपासून मी अशी काय चर्चेत आलीये की, मी थेट ‘वरची पायरी’ गाठलीये, माझी ‘उंची’ वाढलीये..! 5 फेब्रुवारी 2022 रोजी जे कुणी नेते माझ्या अंगावर पडले तेच नेते 11 फेब्रुवारीला माझ्या अंगावर उभे राहिले आणि त्यांनी हार-तुरेही स्वीकारले. चला, हे माझं पायरी पुराण आज मीच तुम्हाला सांगते…

पायरीवरचा प्रसंग 1 ला

5 फेब्रुवारीच्या दुपारी कुणी एक नेते पुणे महापालिकेत आले होते म्हणे ! त्यादिवशी सुटी होती त्यामुळं पालिकेत नेहमीच्या मानानं वर्दळ कमी होती. तितक्यात, पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळून जोरजोरात चपला-बुटांचा आवाज येऊ लागला आणि माझ्या दिशेनं काही पावलं झपाझप पुढं सरकू लागली. मी बिचारी जीव मुठीत घेऊन बसली. काही कळायच्या आत एकच गडबड-गोंधळ सुरू झाला… तिकडं पावलांची गती वाढली आणि इकडं माझी धडधड वाढली. तितक्यात, ‘धडाम…’ असा जोराचा आवाज झाला. पाहाते तो काय, माझ्या अंगावर कुणी तरी पडलं होतं. त्यांचं विव्हळणं पाहून मी देखील विव्हळली. मग मात्र कुणी तरी त्यांना हाताला धरून उठवलं आणि गाडीत घालून हॉस्पिटलला नेलं… पुढं काय झालं हे मला नाही सांगता यायचं. कारण मी तर बिचारी पायरी; वर्षानुवर्षे एकाच जागी अडून बसलेली…

पायरीवरचा प्रसंग 2 रा

5 फेब्रुवारी 2022 रोजी माझ्याबाबतीत घडलेला प्रसंग मी विसरले नाही तोच दुसरा प्रसंग घडला. 11 फेब्रुवारी हा पालिकेचा कामाचा दिवस होता त्यामुळं हू म्हणून गर्दी… पण आजची गर्दी काहीशी वेगळी होती. बघता बघता सारा परिसर या गर्दीनं व्यापून गेला. काही जण तर माझ्या अंगाखांद्यावर बराच वेळ बसून कुणाची तरी वाट पाहात बसले होते. तितक्यात, त्यादिवशी जे कुणी नेते पडले तेच माझ्या अंगाखांद्यावर येऊन उभे राहिल्याचे मला दिसले आणि मी ज्यांच्यासाठी विव्हळले होते त्यांना सुखरूप पाहून मला हायसे वाटले. त्या नेत्याचा हार-तुरे देऊन सत्कारही झाला. माझ्या अंगावर कुणी तरी पडलं, धडपडलं याचं दुःख तर झालं होतंच पण त्या पडलेल्या व्यक्तीचा माझ्याच अंगाखांद्यावर सत्कार झाला हे पाहून आनंदही झाला.

पायरीवरचा प्रसंग 3 रा

सत्काराचा कार्यक्रम आटोपला. बराच वेळ माझ्या अंगाखांद्यावर बसलेले, उभे असलेले नेते, कार्यकर्ते निघून गेले आणि मी पुन्हा एकटी पडले तोच माझ्या अंगावर कुणीतरी गोमूत्र शिंपडलं आणि मला धूवूनही काढलं. कदाचित, मी अनुभवलेलं दुःख आणि त्यानंतर उपभोगलेला आनंद या भावना माझ्या मनात घर करून राहू नयेत, पायरीनं ‘पायरी’ सोडू नये, मी माझी ‘पायरी’ धरून राहावं या हेतूपोटी माझी शुद्धता केली गेली असावी.

असो, या सगळ्या प्रसंगांत मी मात्र चर्चेत आले हेही नसे थोडके ! अर्थात, माझ्या पायरीवरून कोण पडलं, कोण उभं राहिलं याच्याशी माझा संबंध तो काय ? भले ही मी मोठ्या तोऱ्यात यापूर्वी म्हणून गेली असेन की, काही दिवसांपासून मी थेट ‘वरची पायरी’ गाठलीये, माझी ‘उंची’ वाढलीये तर ते केवळ म्हणण्यापुरतं बरं का ! कारण भविष्यात वर्षानुवर्षे पुणे महापालिकेची पायरी बनून राहाणं आणि ये-जा करणाऱ्यांच्या पावलांना आधार देणं हीच माझी ‘पायरी’… इति श्री पायरी पुराणं महिमा सफल संपूर्णम् …!

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च

Posted by - May 16, 2024 0
पुणे : पुणे ,शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच मतदान सोमवारी पार पडले आहे. मात्र, पुणे मतदारसंघामध्ये उमेदवारांनी लाखोंने पैसे निवडणूक प्रचारात खर्च…
Chandni Chowk

Chandni Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून प्रवाशांसाठी खुला; कशा आहेत मार्गिका?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची (Chandni Chowk Flyover) ओळख आहे.त्या चौकामध्ये (Chandni Chowk Flyover) प्रवाशांना अनेक वर्षांपासून…
Mumbai Pune Accsident

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

Posted by - May 19, 2023 0
मुंबई : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) भीषण अपघात (Accident) झाला…

चांदणी चौक पूल 1 व 2 ऑक्टोबर दरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार ; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - September 27, 2022 0
पुणे : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट…

धक्कादायक:”कुणाकडे तक्रार करायची तर कर,मी कुणाला घाबरत नाही”,अशी धमकी देऊन पिटी शिक्षकानेच केला अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Posted by - July 10, 2022 0
पुणे : “कुणाकडे तक्रार करायची तर करा,मी कुणाला घाबरत नाही….”अशी धमकी देऊन शाळेतील पिटी शिक्षकानेच अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *