डायरेक्टर… रायटर… अ‍ॅक्टर… आणि आता डॉक्टर !

561 0

एकेकाळी M. Phil. किंवा SET/NET होण्यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारणाऱ्या नागराज मंजुळे यांना पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठानं D. Litt. ही पदवी बहाल केली आणि वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागराज मंजुळेंना डॉ. नागराज मंजुळे बनवलं.
———————-
संदेशप्रधान चित्रपट साकारण्यात हातखंडा असलेला दिग्दर्शक !

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आलीये. पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि आता झुंड अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती करत मंजुळे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय. लेखन, दिग्दर्शनासह विविध चित्रपटांमधून अभिनयही केलाय. सामाजिक आशय डोळ्यांसमोर ठेवून संदेशप्रधान चित्रपट साकारण्यात हातखंडा असलेल्या मंजुळे यांनी आपल्या चित्रपटांतून नेहमी नवख्या कलाकारांना संधी दिली. त्यांच्या चित्रपटांतील पात्रं जणू आपणच असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण होत गेली आणि त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. मंजुळेंच्या ‘सैराट’नं तर अनेक विक्रम मोडीत काढले आणि मराठी चित्रपटाच्या इतिहासात 100 कोटींचा टप्पा पार करणारा तो पहिलाच चित्रपट ठरला. त्याआधी ‘फँड्री’नं प्रेक्षकांना वेड लावलं तर ‘फँड्री’ या चित्रपटासह त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

पहिल्या-वहिल्या हिंदी चित्रपटात थेट बच्चनना घेतलं…

बिग बी अमिताभ बच्चन यांना आपलं ‘रोल मॉडेल’ मानून चित्रपट क्षेत्रात आपली कलाकारी दाखवणाऱ्या मंजुळे यांनी आपल्या पहिल्या-वहिल्या हिंदी चित्रपटात थेट बच्चन यांना घेऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारलीये. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरूये. नवख्या कलाकारांसह केलेल्या या कलाकृतीचं कैक दिग्गज कलाकारांनी कौतुक देखील केलंय.

जीवनमान ढवळून काढणारा आशय, नेमका व अचूक संदेश देणारी कथा आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून पटकथेला पडद्यावर जिवंत करण्याची हातोटी या सर्व कलांचं मिश्रण म्हणजे नागराज मंजुळे. या अशा प्रतिभावान लेखकाला, अभिनेत्याला आणि दिग्दर्शकाला मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून डी. वाय. पाटील विद्यापीठानं या हरहुन्नरी कलाकाराचा यथोचित सन्मान केलाय.

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे …! डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

Posted by - October 6, 2022 0
माननीय श्री. उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र. काल विजयादशमी झाली. या नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस सारा महाराष्ट्र आदिशक्तीचा जागर करीत…

मुंबई : आपत्ती व्यवस्थापन संचालकपदासाठी अधिकारी मिळेना; 7 महिन्यांपासून पद रिक्त

Posted by - July 12, 2022 0
मुंबई: राज्यातील कोणत्याही विभागात, जिल्हयात कसलीही आपत्ती आली तर त्या ठिकाणी तातड़ीने मदत पोहचिण्याचे, त्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम…

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला “हा” मोठा निर्णय

Posted by - March 5, 2022 0
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने…

‘लगेच गुडघ्याला बाशिंग बांधू नका…!’ अजित पवारांनी वडेट्टीवारांना सुनावले

Posted by - March 31, 2023 0
भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच…

दसरा मेळावा : शिंदे गटाच्या पोस्टर नंतर आता टीझर देखील रिलीज ; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज

Posted by - September 29, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरुन जोरदार टोलवाटोलवी केली जाते आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *