प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली- जगदीश मुळीक

277 0

आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.
प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळांबाबत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्या तपासणीसाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळावी, मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्या केल्या. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल. असा इशारा दिला.
मुळीक म्हणाले, महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने दिनांक 23 जून 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ती करताना एका प्रभागातील मतदार दुसर्‍या प्रभागात टाकणे काही याद्या गायब होणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. महापालिका हद्दी बाहेरील गावातील मतदारांचा पुणे महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मतदार याद्या बीएलओ कडून करून घेणे अपेक्षित असताना संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडल्या गेल्याने त्यात चुका झाल्या आहेत. विविध प्रभागांमधील चार ते पाच आणि दहा ते पंधरा मतदार याद्या दुसर्‍या प्रभागात जोडल्या गेल्या आहेत. 58 प्रभागांपैकी 17 प्रभागात लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे प्रमाण जवळपास 30 टक्के इतके आहे.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, वर्षा तापकीर,मा सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, सुशिल मेंगडे, प्रशांत हरसूले, मा.नगरसेवक योगेश मुळीक, मंजुषा नागपुरे, छाया मारणे, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, राहूल भंडारे, सुनिता वाडेकर, गणेश कळमकर, तुषार पाटील, महेश गलांडे, पूनित जोशी, साचीन मोरे, महेश पुंडे, अनिता तलाठी, चंद्रकांत जंजिरे, सुनिल खांदवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मोठा निर्णय

Posted by - February 5, 2022 0
पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही. अजून एकदोन आठवडे थांबूनच…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची सुरक्षेत कपात?

Posted by - June 21, 2023 0
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने…
eknath shinde

राज्य सरकारचा मोठा निर्णय! महिला आणि बालकांसाठी नवी हेल्पलाईन सुरु करणार

Posted by - May 4, 2023 0
मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महिला आणि बालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील संकटग्रस्त महिला…

पुढील दोन दिवसात पाणी प्रश्न काही प्रमाणात कमी होईल – गिरीश बापट

Posted by - March 27, 2022 0
गिरीश बापट यांनी थेट आयुक्त विक्रमकुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले. यावेळी गिरीश बापट म्हणाले, शहरात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *