Dr. Vijay Bhatkar : महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक-शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

173 0

पुणे : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार आज जाहीर झाला आहे .पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे आज ही घोषणा केली. डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं यंदाचे पुरस्कार्थी निश्चित केले आहे. यावेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली .

पुरस्कराचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. सलग ३५ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही ह्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. आहे बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती, या नगरीच्या ग्रामदैवतांसह वैशिष्ट्यपूर्ण अशा या पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतीचिन्हात आहे. पुरस्काराच्या रक्कमेत या वर्षी पासून वाढ करण्यात आली असून रू १,००,०००( रुपये एक लाख) वरून ती रु. २,००,००० (रुपये दोन लक्ष) करण्यात आली आहे . पुरस्कार रकमेचा धनादेश पुरस्कार्थी डॉ. विजय भटकर यांना देण्यात येईल . पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात येईल.

महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी, ज्येष्ठ नेते शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव व सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशिलकुमार शिंदे, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायणमूर्थी, शरद यादव, नितीन गडकरी, पं.हरिप्रसाद चौरसिया, पं. अमदजअली खान व पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यतूनच द्यावे लागणार – ॲड. श्री.पुरुषोत्तम खेडेकर

Posted by - October 21, 2023 0
पुणे : मराठा (Maratha Reservation) सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री. पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्री. गंगाधर बनबरे, सचिव…

मनसे-भाजप युती होणार ? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितले…….

Posted by - April 14, 2022 0
राज्यात परत भाजप मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी त्यावर असा कुठलाही प्रस्ताव नाही आमची 13 जणांची कोअर टीम…

Pune Crime : फंडात पैसे गुंतवताय ? सावधान…! कोथरूडमध्ये महिलांची लाखो रुपयांची फसवणूक

Posted by - July 25, 2022 0
पुणे : अज्ञान हे अनेक प्रकारच्या फसवणूक आणि गुन्ह्यांना सहज घडवून आणण्यासाठी सर्वात मोठा मार्ग आहे. अर्थात केवळ बँकेतील व्यवहार…

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा करावा; अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्रींची भेट

Posted by - October 19, 2022 0
पुणे : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या…

नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा : वर्चस्व गाजविण्यासाठी नव्हे तर जगाला प्रेरणा देण्यासाठी ; खा. डॉ. सुधांशू त्रिवेदी यांचे प्रतिपादनभारताचा उदय

Posted by - August 20, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नव्या भारताचा उदय होत असून भारताचा हा उदय अन्य राष्ट्रांवर वर्चस्व गाजविण्यासाठी नाही तर जगाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *