डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते तेजस्वी सेवेकरी व रेगे दाम्पत्यास डॉ. पूजा यादव गौरव पुरस्कार प्रदान

98 0

पुणे : सामाजिक क्षेत्रात गल्यामर्स ची क्रेझ वाढत असताना कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी समाजाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात केले.

अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेतर्फे ज्येष्ठ सामाजिक दिवंगत कार्यकर्त्या डॉ पूजा यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी रस्त्यावरील दत्त मंदिराजवळील मांगल्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ मोरे बोलत होते. डॉ. मोरे यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संतुलन संस्थेचे संस्थापक ऍड बी एम रेगे व संचालिका पल्लवी रेगे खाणकामगारांच्या हक्कासाठी कार्याबद्दल आणि सहेली संस्थेच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी याना देवदासी महिलांना परिसर स्वच्छतेचे मह्त्व पटवून देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल डॉ पूजा यादव गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकास यादव, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, सामाजिक कार्यकर्ते भोला वांजळे,माजी नगरसेवक दत्ता सागरे, काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण करपे,दादा पासलकर,आनंद सराफ,गणेश चव्हाण, वंदना भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ मोरे आपल्या भाषणात म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे . प्रकाश यादव यांनी प्रास्ताविक केले . वांजळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Share This News

Related Post

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीची उद्या सकाळी दहा वाजता सुरू होणार मतमोजणी; निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

Posted by - March 1, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक ही 26 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल आता उद्या म्हणजेच दोन मार्चला लागणार…
SSC Result Date

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Posted by - May 22, 2024 0
पुणे : बरावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ आता लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दहावीच्या निकालाची (SSC Result…
Punit Balan

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Posted by - February 15, 2024 0
पुणे : खडकी येथील गुरूद्वारा श्री गुरु सिंह सभा परिसराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पुनीत बालन (Punit Balan) ग्रुपचे अध्यक्ष व युवा…

अबब ! राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक ; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक

Posted by - March 16, 2022 0
नाशिक- आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील पालकांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांनी…
Pune News

Pune News : महाराष्ट्र सरकारने जागे होत संविधानविरोधी/ शिक्षण हक्क विरोधी आरटीई कायदा बदल तातडीने मागे घ्यावा

Posted by - May 7, 2024 0
पुणे : राज्य शासनाने आर टी ई कायद्यामधील नियमावलीत जे बदल केले आहेत त्याला काल मुंबई खंडपीठाने राज्य सरकारला फटकारत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *