संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे यांचं निधन

468 0

पुणे: संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचं आज त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात मुलगी सून आणि नातवंड असा परिवार आहे. 

रामचंद्र देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.

देखणे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर ते ३०-४-२०१४ रोजी निवृत्त झाले.

२३-२४ ऑक्टोबर २००४ या दरम्यान राळेगण सिद्धी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात मोलाचे योगदानकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ११ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे झालेल्या १२व्या “राष्ट्रीय बंधुता साहित्य संमलना’चे अध्यक्षपद भूषविले. अमेरिकेत झालेल्या विश्‍व साहित्य संमेलनातील “संतसाहित्य आणि आधुनिकता’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र देखणे होते. सासवडच्या मराठी साहित्य संमेलनप्रसंगी (जानेवारी २०१४) ‘प्रश्न आजचे उत्तरे संतांची’ या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी रामचंद्र देखणे होते. कडोली साहित्य संघाच्या माचीगड येथे २७-१२-२०१०ला झालेल्या १३व्या कडोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. संमेलनपूर्व संमेलनात रामचंद्र देखणे यांचा “साहित्यातील लोकरंग’ हा कार्यक्रम झाला होता.

 

Share This News

Related Post

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार ; २ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

Posted by - August 31, 2022 0
पुणे : यावर्षीच्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य…
Dhangar Society

Dhangar Society : पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

Posted by - February 7, 2024 0
पुणे : सर्व धनगर समाज बांधवांना (Dhangar Society) केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, यासाठी पुणे…

ऐतिहासिक निकाल ! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 38 जणांना फाशीची शिक्षा

Posted by - February 18, 2022 0
अहमदाबाद- अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका तासात 21 बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी…

#PUNE : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, ” माझ्याच घरात वाटले पैसे…!”

Posted by - February 27, 2023 0
पुणे : काल पुण्यात कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. ही पोट निवडणूक होण्याआधी आणि पार पडल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप…

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Posted by - March 21, 2023 0
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *