डॉ. लता प्रकाश यांच्या माय लोटस माइंड या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन

310 0

पुणे :डॉ. लता प्रकाश यांनी लिहिलेले माय लोटस माइंड हे पुस्तक आज पुण्यात खुप चर्चेत आहे. पुस्तकात वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या संस्कृतीवर आधारित सहा लघुकथांचा समावेश आहे. या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन आज पुण्यातील ताज ब्लू डायमंड येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दीपप्रज्वलनाने आणि लेखीकेने स्वतः रचलेल्या आणि लिहिलेल्या प्रार्थना गीतने झाले. पुस्तकाचे अधिकृत अनावरण सुनीता कल्याणी (संचालक, कल्याणी ग्रुप) आणि डॉ. गजानन आर. एकबोटे (चेअरमन, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी लेखीकेला पुस्तकातील काही उतारे वाचण्यासाठी आमंत्रित केले गेले आणि त्यांनी त्यातील काही मनोरंजक किस्से सांगितले. एक वैद्यकीय डॉक्टर असताना आयुष्यातील या वळणावर पुस्तक लिहिण्याचा विचार कसा मनात आला आणि त्यामागील प्रेरणा याबद्दलही त्यांनी सांगितले. डॉ. लता प्रकाश या व्यवसायाने बालरोगतज्ञ आहेत पण त्यांचे मन नेहमीच कलेत रमते.

आयुष्यभर त्यांचा कल संगीताकडे आणि पुस्तकांकडेच राहिला आहे,त्या कीबोर्ड वाजवतात आणि त्यांनी सत्तरहून अधिक मूळ गाणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहेत. हा त्यांचा पहिला लघुकथा संग्रह आहे.

पूर्वीच्या मध्य प्रदेशातील आदिवासी जंगलांपासून ते ऋषिकेशच्या वळणदार गल्ल्यांपर्यंत, केंब्रिज विद्यापीठाच्या सभागृहापासून आसामच्या हृदयापर्यंत, हे पुस्तक मानवी भावना आणि स्वप्ने, आशा आणि स्मृती, हरवलेल्या आणि मिळालेल्या प्रेमाची विविध श्रेणी विणते. जरी पुस्तकात स्त्रीवाद, अध्यात्म आणि देशभक्ती या अंतर्निहित आहेत, परंतु हा संग्रह कोणत्याही एका शैलीने बांधला गेलेला नाही. प्रत्येक कथेसह वाचक त्यातील पात्रांचा, विविध भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतीचा खोलवर अनुभव घेतील

या प्रसंगी बोलताना लेखिका म्हणतात की, “माझ्या पहिल्या नातवाचा जन्म यूकेमध्ये घरापासून खूप दूर झाला, तेंव्हा माझी नात मोठी झाल्यावर नेहमी तशीच व मनाने भारतीय राहावी अशी माझी इच्छा होती. तरुणांना त्यांच्या समृद्ध इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल आणि आपल्या विशाल मातृभूमीच्या सामाजिक संरचना आणि भूगोलाबद्दल कथांद्वारे शिक्षित करण्याचा पुस्तक हा एक चांगला मार्ग आहे , आणि यातुनच या पुस्तकाचा जन्म झाला.

या कथा लवकरच भारताच्या आणि जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपर्या पर्यंत पोहचतील. या कथा जगभरातील तरुण आणि प्रौढांसाठी आहेत ज्यांना भारतीयांच्या दैनंदिन जीवनाची जाणीव करून घ्यायची आहे. कधी मार्मिक, कधी गमतीशीर व नेहमीच उत्तेजक अश्या या कथा वाचकांच्या नक्कीच पसंतीत उतरतील. हे पुस्तक २० ऑगस्ट २०२२ रोजी विश्वकर्मा पब्लिकेशन द्वारे प्रकाशित झाले असुन त्याची किंमत रु. २८५ आहे. भारतीय लेखीकेच्या या इंग्रजीत लघुकथांचा संग्रह www.amazon.in वर उपलब्ध आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुणे पोलिसांनी गुडलक कॅफेजवळ पाच कोटीं किंमतीची व्हेल माशाची उलटी केली जप्त

Posted by - September 3, 2023 0
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune News) घटनांमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी कारवाई करत…

‘बेताल ,सत्तापिपासू चंपा’ रुपाली पाटील यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

Posted by - May 26, 2022 0
पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी समाचार घेतला आहे. रूपाली पाटील यांनी चंद्रकांत…

सावरकर पुण्यतिथीनिमित्त नागरिकांनी घेतले फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘त्या’ खोलीचे दर्शन

Posted by - February 26, 2022 0
पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सावरकरांच्या साहित्याचे…

पुढचे 5 वर्षसुध्दा राज्यात आमचचं सरकार – रावसाहेब दानवे

Posted by - October 16, 2022 0
पुणे: राज्य सरकारमध्ये कोणीही नाराज नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुढचे 5 वर्ष सत्तेत येईल असा विश्वास…

बांधकाम व्यावसायिक गणेश भिंताडे यांचे निधन

Posted by - February 7, 2022 0
पुणे- बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे कार्यकर्ते गणेश भिंताडे (वय ४४) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. आज पहाटे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *